शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वजनांच्या हेराफेरीत ग्राहकांची लूट

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

खुलेआम फसवणूक : आठवडी बाजारातील विके्रत्यांवर नियंत्रण कुणाचे?

खुलेआम फसवणूक : आठवडी बाजारातील विके्रत्यांवर नियंत्रण कुणाचे?
नागपूर : सर्वाधिक ग्राहकांना फसविले जाणारे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. वजनांची हेराफेरी करून खुलेआम येथे ग्राहकांची फसवणूक होते. ग्राहक सर्रास लुटले जात असताना बाजारातील विक्रेत्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. ग्राहक पंचायत यासाठी वैधमापन विभागाला जबाबदार धरते, तर वैधमापन विभाग महापालिकेकडे बोट दाखविते. शासकीय संस्थांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भानगडीत ग्राहकांचे उघड्यावर खिसे कापले जातात.
आठवडी बाजार सदरचा असो की सोमवारी पेठेतील येथे ग्राहक खुलेआम लुटला जातो आहे. वजनात हेराफेरी, काटा मारणे, प्रमाणित वजनाचा उपयोग न करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. हेराफेरीत किलोभराची भाजी तीन पाव ग्राहकांना मिळत आहे. ग्राहकांनाही याची माहिती आहे. मात्र दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही, त्यामुळे ग्राहकांची मुस्कटदाबी होत आहे. महापालिकेच्या क्षेत्रात ८ झोनमध्ये २३ अधिकृत बाजार तर २४ अनधिकृत बाजार आहेत. दररोज लाखो ग्राहक बाजारातून भाजी व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. महापालिका बाजारातील विक्रेत्यांकडून ठराविक रक्कम आकारते. महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आठवडी बाजार आहे. असे असतानाही महापालिकेकडून ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही उपाययोजना होत नाही.
बाजारातील विक्रेत्यांच्या मनमानीला सजग ग्राहकही बळी पडतो. विक्रेत्याला ग्राहकांना विरोध केल्यास तू तू-मै मै करण्याची वेळ येते. खुलेआम लूट होत असली तरी ग्राहकांना कुठलेही संरक्षण नसते.
इलेक्ट्रॉनिक काटे उपलब्ध असतानाही हे विक्रेते आजही तराजूचा काटा वापरतात. वजन करताना काट्यात हातचलाखी करतात. त्यामुळे दररोज आठवडी बाजारात ग्राहक लाखो रुपयांनी फसविला जात आहे.
:::चौकट:::
वैधमापन विभागाची जबाबदारी
विक्रेत्यांकडून होत असलेली हातचलाखी रोखण्यासाठी वैधमापन विभागाने बाजारावर धाडी टाकाव्यात. विक्रेत्यांना दंडित करावे. महापालिक ा जेव्हा विक्रेत्याकडून पैसे आकारते तेव्हा ग्राहकांच्या सुरक्षेकडेही लक्ष देण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी.
गजानन पांडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत