शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:40 IST

एका अमेरिकन संघटनेने भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरुन टीका केली आहे.

नवी दिल्ली: भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) ने भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. मात्र, आता भारतानेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी या संघटनेला पक्षपाती आणि ठराविक राजकीय अजेंडा असलेली संघटना म्हटले.

भारताचे प्रत्युत्तरभारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल म्हणाले की, हा पक्षपाती आणि राजकीय अजेंडा चालवण्याऐवजी या संघटनेने अमेरिकेतील मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इकडे वेळ वाया घालवण्याऐवजी स्वतःच्या देशातील मुद्द्यांकडे लक्ष द्या, अशा शब्दात त्यांनी अमेरिकेला फटकारले. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीच्या काही तासांनंतर या संघटनेने अहवाल जारी केला. या अहवालावर तज्ञ भारतावर दबाव आणण्याची रणनीती म्हणून पाहत आहेत. 

USCIRF च्या अहवाल काय आहे?USCIRF ने आपल्या अहवालात भारतात धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. "हा अहवाल ठळकपणे दर्शवतो की, 2024 मध्ये काही ठराविक गटांकडून व्यक्तींना मारले गेले, मारहाण केली गेली आणि त्यांची हत्या केली गेली. धार्मिक नेत्यांना मनमानीपणे अटक केली गेली आणि घरे आणि प्रार्थनास्थळे पाडली. या घटना विशेषतः धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन करतात. सरकारी अधिकाऱ्यांकडून द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती पसरवणे आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भडकावणे अशा प्रकरणांचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. अहवालात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), समान नागरी संहिता (UCC) आणि अनेक राज्यस्तरीय धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायद्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत