शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांवर 'टोल'धाड! देशातील महामार्गावरील टोलमध्ये ५ ते १० टक्क्यांच्या वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 14:38 IST

देशात सध्या मोठ्या प्रमाणात एकापेक्षा एक जबरदस्त महामार्ग आणि द्रूतगती मार्ग बांधले जात आहेत.

नवी दिल्ली

देशात सध्या मोठ्या प्रमाणात एकापेक्षा एक जबरदस्त महामार्ग आणि द्रूतगती मार्ग बांधले जात आहेत. नुकतंच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा खुला करण्यात आला. हे महामार्ग सुरू झाल्याने एका बाजूला रस्ते वाहतुकीत सुधारणा झाली असली तर दुसऱ्याबाजूला महामार्गावरील टोलच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत आता तुमची लाँग ड्राइव्ह महाग होणार आहे.

देशातील महामार्गावर जमा होणाऱ्या टोल टॅक्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एनएचएआयने ठेवला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल दर वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे आणि तो रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. आता यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.

या वाहनांसाठी टोल वाढणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NHAI ने कारसारख्या हलक्या वाहनांसाठी ५ टक्के आणि ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी १० टक्के टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाला पाठवला आहे. मंत्रालयाने NHAI च्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिल्यास, नवीन टोल दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हा अंतिम निर्णय घेतल्यानंतरच रस्ते वाहतूक मंत्रालय आदेश जारी करेल.

सरकारने बजेटमध्ये केली १० लाख कोटींची तरतूदकेंद्रातील मोदी सरकार देशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी वेगाने काम करत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिथे सरकारने भांडवली खर्चासाठी ७.५ लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. त्याच वेळी पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ते १० लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे.

भांडवली खर्चाचा मोठा हिस्सा देशातील रस्त्यांच्या विकासावर खर्च केला जातो. अलीकडेच सरकारने दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा सुरू केला. हा एक्स्प्रेस वे जगातील सर्वात लांब एक्स्प्रेस वेपैकी एक आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचा प्रवास २४ तासांवरून १२ तासांवर येईल. याशिवाय सरकार देशात सातत्याने रस्त्यांचे जाळे वाढवत आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून आजूबाजूच्या प्रमुख शहरांमध्ये ट्राफिकमुक्त वाहतूक व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :NHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण