शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘सखी मंच’च्या विजेत्यांची दिल्ली हवाई सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 05:25 IST

मार्च २०१९पर्यंत ८० टक्के गंगा शुद्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

अमृता कदम नवी दिल्ली : मार्च २०१९पर्यंत ८० टक्के गंगा शुद्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. ‘लोकमत-सखी मंच’च्या भगिनींशी गुरुवारी संवाद साधताना गडकरी यांनी गंगा शुद्धीकरण प्रकल्पाविषयी माहिती दिली.‘लोकमत-सखी मंच’तर्फे ५१ सखींना दिल्ली हवाई सफर घडविण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या या सखींना दिल्लीदर्शनाबरोबरच नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाण्याची संधी मिळाली. गडकरींकडे सोपविण्यात आलेल्या गंगा शुद्धीकरण खात्यातील कामांविषयी सखींनी उत्सुकतेने प्रश्न विचारले.गंगेच्या प्रदूषणामध्ये ७० टक्के वाटा असलेल्या दहा मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केले असून ते रोखण्यासाठी १८९ प्रकल्पांचेनियोजन केले आहे. गंगेच्या काठावरील ४५०० गावे ‘गंगाग्राम’ म्हणून विकसित होणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट यांची मदत घेणार आहोत, असे सांगून गडकरी यांनी गंगेद्वारे पर्यटन, रोजगाराला चालना देण्याचा मानसही व्यक्त केला.या सखींनी दिल्ली दर्शनाचाही आनंद लुटला. २०१७मध्ये ‘सखी मंच’च्या सभासद झालेल्या अडीच लाख सदस्यांपैकी ५१ भाग्यशाली विजेत्या सखींना ही सफर घडविण्यात आली. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन, इंडिया गेट, राजपथ, नॉर्थ ब्लॉक-साऊथ ब्लॉक अशा ल्युटन्स दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना सर्व सखींनी भेट दिली.या सखींसोबत नाशिक ‘लोकमत’चे उपाध्यक्ष बी.बी. चांडक, नागपूर ‘लोकमत’चे इव्हेन्ट हेड नितीन नौकरकर, संखी मंच नागपूरच्या संयोजिका नेहा जोशी, मुंबईचे राघवेंद्र शेट, तनुजा भालेराव, नूतन शिंदे हेही होते.काय आहे ‘लोकमत - सखी मंच’? : महिलांच्या अभिव्यक्ती व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ज्योत्सना दर्डा यांनी २००० साली ‘लोकमत-सखी मंच’ची सुरुवात केली.१७ वर्षांमध्ये ‘सखी मंच’ महाराष्ट्रामधील महिलांसाठीचे सर्वांत मोठे व्यासपीठ ठरला आहे. ‘सखी मंच’ची राज्यात शंभरहून अधिक केंद्रे आहेत. सखी सम्राज्ञी, संक्रांत मेळावा, कौशल्य विकासासाठी कार्यशाळा, दर्जेदार मराठी नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम ‘सखी मंच’तर्फे आयोजित केले जातात.क्लीन गंगा मिशनसाठी एक कोटी लोकांकडून देणगी घेण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना, त्यात ‘लोकमत - सखी मंच’ने हातभार लावावा, असे आवाहन गडकरींनी केले. हा संदेश आपल्या मित्रमंडळी, नातेवाइकांपर्यंत पोहोचवावा, असेही गडकरी म्हणाले. या मिशनसाठी देणगी चेकने स्वीकारली जाईल आणि डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून संबंधित विभागांपर्यंत पोहोचवली जाईल.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट