शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: तातडीनं होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब; दोन्ही लोकशाहीसाठी घातकच- उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 22:33 IST

हैदराबाद  बलात्कार प्रकरणात करण्यात आलेल्या एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचं विधान

नवी दिल्ली: न्यायदानास होणारा विलंब लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र त्यामुळे तातडीनं दिल्या जाणाऱ्या न्यायाचं समर्थन करता येणार नाही. देशात सर्वकाही घटनेनुसार व्हायला हवं, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केलं आहे. हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करणाऱ्या चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये तातडीनं न्याय देण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नायडूंनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपतींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.देश घटनेनुसार चालावा यासाठी माध्यमांपासून न्यायालयापर्यंत सर्वांनी सोबत काम करण्याची गरज असल्याचं मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं. प्रत्येक क्षेत्रानं घटनेचं पालन करायला हवं. सध्या देशात तातडीनं न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र तुम्ही तातडीनं न्याय देऊ शकत नाही आणि विलंबानं न्यायदान करणंदेखील योग्य नाही. तात्काळ न्याय आणि न्यायदानातील विलंब या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत, असं नायडू म्हणाले. तुम्हाला गुन्हा नोंदवावा लागेल, त्याचा तपास पूर्ण व्हायला हवा, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण व्हायली हवी. यंत्रणा अशाच प्रकारे काम करते आणि हीच पद्धत योग्य आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. आपण घटनेनुसार चालणाऱ्या देशात राहतो. त्यामुळे आपण संपूर्ण प्रक्रियेचं पालन करायला हवं. घाईघाईनं एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचणं योग्य नाही. मात्र निर्णयास विलंब होणंदेखील चुकीचं आहे. त्यामुळे न्यायदान करताना होणारा उशीर टाळायला हवा, असं मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं. माध्यमांनी टीआरपीच्या स्पर्धेत न धावता बातमी आणि विचार यांच्यामधील अंतर समजून घ्यायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं. सर्वसामान्यांनी खोट्या बातम्यांपासून सतर्क राहण्याची गरजदेखील त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूhyderabad caseहैदराबाद प्रकरण