शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक?; EC च्या व्हायरल पत्राबाबत दिल्ली आयोगाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 18:37 IST

आगामी लोकसभेचे वेध सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्य जनतेलाही लागले आहेत

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून विविध कार्यक्रम, मेळावे आणि अधिवेशनातून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देत आहेत. तर, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यामुळे, भाजपाने याच सोहळ्यातून लोकसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच, दिल्ली निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार आगामी लोकसभानिवडणूक १६ एप्रिल रोजी होणार असल्याची चर्चा सोशल माध्यमांत रंगली आहे. त्यावर, आता दिल्ली निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण दिलं आहे. 

आगामी लोकसभेचे वेध सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्य जनतेलाही लागले आहेत. त्यातच दिल्ली निवडणूक आोयगाचं एक सर्क्युलर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यामध्ये, १६ एप्रिल २०२४ ही आगामी लोकसभा निवडणुकांची संभावित तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे, १६ एप्रिल २०२४ रोजी निवडणुकांची तारीख निश्चित झाली का, असा प्रश्न पत्रकारांसह सर्वांनाच पडला होता. त्यावर, आता दिल्ली निवडणूक आयोगाने ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. 

दिल्ली निवडणूक आयोगाच्या पत्रकावरील १६ एप्रिल रोजीच्या लोकसभा निवडणुकांच्या तारखेबद्दल पत्रकारांकडून सातत्याने विचारणा केली जात आहे. त्यावर उत्तर देताना, दिल्ली निवडणूक आयोगाने स्पष्टपणे यास नकार दिला. तसेच, या तारखेचा उल्लेख केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक योजनांसंदर्भातील कार्यक्रमाची तयरी करण्याच्या अनुषंगाने करण्यात आला आहे. त्यामुळे, या पत्रकानुसार जो संभ्रम निर्माण झाला होता, तो दिल्ली निवडणूक आयोगाकडून दूर करण्यात आला आहे. 

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र करण्यासाठी नवीन ईव्हीएम मशिन्सची खरेदी करण्यासाठी निवडणूक आयोगाला १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ईव्हीएमच्या उपयुक्ततेचा कालावधी १५ वर्षांचा आहे. त्यामुळे, एकत्रित निवडणुका घेतल्यास या मशिनचा वापर केवळ तीनवेळाच होऊ शकतो. यंदा लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देशभरात ११.८० लाख मतदान केंद्र उभारले जाण्याची गरज आहे. तर, एकत्रित निवडणुका घेतल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशिन्सची गरज पडणार आहे. यासह काही त्रुटींच्या अनुषंगाने ‘कंट्रोल यूनिट’ (सीयू), ‘बॅलट यूनिट’ (बीयू) आणि ‘वोटर-वेरिफियेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (वीवीपॅट) मशिन्सचीही  आवश्यकता असते. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानSocial Viralसोशल व्हायरल