शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 19:05 IST

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश

नवी दिल्ली: ईव्हीएमवरुन वाद सुरू असल्यानं उद्या मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची शक्यता गृह मंत्रालयाला आहे. त्यामुळेच मंत्रालयानं सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काही व्यक्तींकडून हिंसेला प्रोत्साहन देणारी भडकावू विधानं केली जाण्याची शक्यता असल्यानं मतमोजणी केंद्रं आणि ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळील सुरक्षेत वाढ करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याच्या सूचनादेखील गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान रविवारी संपलं. उद्या सकाळी 8 पासून देशभरात मतमोजणीला सुरुवात होईल. यावेळी काही भागात हिंसाचार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याच्या सूचना गृह मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या गेल्या आहेत. मतमोजणी केंद्रं आणि स्ट्राँग रुम्सची सुरक्षा वाढवण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. काही व्यक्तींकडून चिथावणीखोर विधानं करुन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळेच गृह मंत्रालयानं ही सूचना केली आहे. ईव्हीएमबद्दल भाष्य करताना माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी भडकावू विधान केलं आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यास रक्त सांडेल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हत्यार उचलण्याची गरज भासल्यास तेही करू, असंदेखील कुशवाहा म्हणाले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९