शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! कर्तव्यावर असलेल्या 200 जवानांची दोन दिवस उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 11:49 IST

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशातच निवडणुकीसाठी जवानांना तैनात केलं जात आहे.

जयपूरः देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशातच निवडणुकीसाठी जवानांना तैनात केलं जात आहे. पण निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना त्याचा मोबदला तर सोडाच, दोन दिवस उपाशी ठेवण्यात आलं. त्यानंतर त्या जवानांनाही राग अनावर झाला आहे. राजस्थानमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर जवानांनी पुन्हा निवडणुकीची ड्युटी करण्यास विरोध केला आहे. उन्हात बसून जवानांनी सरकारविरोधात प्रदर्शन केलं आहे. राजस्थानमधल्या बांसवाडा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. जिथे 200 (होमगार्ड) जवान तैनात होते.शहरातील एका शाळेत राहिलेल्या या जवानांनी सांगितलं की, गेल्या दोन दिवसांपासून आमच्याकडे एक रुपयाही नाही आणि आमचं जेवण मेसमध्ये बनतं. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत. अशातच प्रशासन त्यांना कोणताही मोबदला न देता 1 किंवा 2 मे रोजी चुरू आणि भरतपूरसाठी रवाना होण्यास सांगत आहे. त्यामुळे ते जवान प्रशासनावर नाराज आहेत. बाडमेर डी कंपनीचे जवान खेरसिंह म्हणाले, पूर्ण भारतात कुठेही कर्तव्य बजावण्यास तयार आहे. आम्ही आधीही निवडणुकीचं काम केलं आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करण्यास तयार आहोत. परंतु उपाशीपोटी काम होऊ शकत नाही. प्रसारमाध्यमांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा प्रशासन खडबडून जागं झालं. तसेच जवानांना दोन दिवसांचा मोबदला देण्याचे आदेश काढण्यात आले. तो मोबदला लवकरच मिळणार आहे. त्यानंतर जवानांनी पुन्हा निवडणुकीच काम करण्यास सहमती दर्शवली.

तौसाराम नावाच्या जवानाच्या माहितीनुसार, आमच्या खात्यात आगाऊ पैसे जमा केले जातात. त्यानंतर मेसमध्ये जेवण बनवलं जातं. परंतु असं काहीही झालं नाही. त्यामुळेच आम्हाला दोन दिवस उपाशी राहावं लागलं. राजस्थानमधल्या 25 लोकसभा जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान झालं. आता उर्वरित 13 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 6 मे रोजी मतदान होणार आहे. 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019