शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील; एक देश, एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 05:49 IST

कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १८ हजारांहून अधिक पानांचा अहवाल सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घ्याव्या. दुसऱ्या टप्प्यात १०० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेतील समितीने ‘एक देश, एक निवडणूक’बाबत   अहवालात गुरुवारी केली.

कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत राष्ट्रपती भवनात अहवाल सादर केला. एकाचवेळी होणाऱ्या निवडणुकांमुळे विकास व सामाजिक एकसंधता वाढेल, लोकशाही पाया अधिक मजबूत होईल आणि “इंडिया म्हणजे भारत”चे स्वप्न साकार करण्यात मदत होईल, असे समितीच्या १८,००० हून अधिक पानांच्या अहवालात म्हटले आहे.

अहवाल राष्ट्रपतींना सादर करताना कोविंद यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंग, सुभाष कश्यप, गुलाम नबी आझाद आणि कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह इतर समिती सदस्य होते.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या उच्चस्तरीय समितीने ६२ पक्षांशी संपर्क साधला, ज्यापैकी ४७ पक्षांनी प्रतिसाद दिला. त्यातील ३२ पक्षांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याचे समर्थन केले, तर १५ पक्षांनी विरोध केला.

समितीच्या अहवालात कोणत्या शिफारशी? 

- त्रिशंकू सभागृह किंवा अविश्वास प्रस्ताव किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास नवीन लोकसभा स्थापन करण्यासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्या उर्वरित कालावधीसाठी असतील. 

- विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील व विधानसभा लवकर विसर्जित केल्या नसतील, तर लोकसभेच्या कार्यकाळ समाप्तीपर्यंत त्या चालू राहतील. 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनPresidentराष्ट्राध्यक्ष