शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown in West Bengal: भावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 13:28 IST

Lockdown in West Bengal: कोरोनाचे वाढते संकट पाहता पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत.

Lockdown in West Bengal:  महिनाभरापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निवडणुकीच्या मोठमोठ्या रॅली काढणाऱ्य़ा पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) उद्यापासून कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) य़ांच्या धाकट्या भावाचे आजच सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. यामुळे ममता यांनी राज्याला कोरोनाची झळ बसू नये यासाठी 30 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown in West Bengal) करण्य़ाचा निर्णय घेतला आहे. (West Bengal announces full lockdown from May 16 for next 15 days)

Coronavirus : ममता बॅनर्जींना बंधुशोक, धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन

कोरोनाचे वाढते संकट पाहता पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. बंगालमध्ये 16 मे ते 30 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. खासगी ऑफिस, शाळा-कॉलेज बंद राहणार आहेत. फळे, भाज्या आणि किराना दुकाने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांच्या बाहेर पडण्यावर बंदी आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. राज्य सरकारच्या बुलेटीननुसार शुक्रवारी बंगालमध्ये 20,846 नवे रुग्ण सापडले आहेत. 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण दर हा 30 टक्क्यांच्या आसपास आहे. जेव्हा बंगालमध्ये निवडणुकीची घोषणा झाली होती, तेव्हा हाच दर 1 टक्क्यांपेक्षाही कमी होता. सध्या बंगालमध्ये 1,31,792 रुग्ण उपचार घेत आहेत. 

काय असेल बंद -- सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळता), शाळा, महाविद्यालये बंद राहतील. - राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असेल.- आत्यावश्यक सेवा वगळता सर्व इंडस्ट्रीज-फॅक्ट्रीज बंद राहतील. - अत्यावश्यक सेवेत असलेले ट्रक वगळता इतरांच्या हालचालींवर बंदी असेल.- इमरजन्सी शिवाय खासगी कार, टॅक्सी, ऑटो चालणार नाही.- लोकल ट्रेन, मेट्रो सेवा, बस सेवा, ट्रेन सेवा बंद राहतील.

धाकट्या भावाचे कोरोनाने निधन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम बंडोपाध्याय यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. असीम बंडोपाध्याय गेल्या महिनाभरापासून कोरोनावर उपचार घेत होते. दरम्यान, आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यातच त्यांचा प्राणज्योत मालवली. बंडोपाध्याय यांच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोविड प्रोटोकॉलचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्या