शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन हा उपाय नव्हे, ते ‘पॉज बटण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:21 IST

राहुल गांधी यांचे मत; जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा उपाय असूच शकत नाही. लॉकडाउन उठले की विषाणूू पुन्हा त्याचे काम सुरु करेल, असे मत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असेही त्यांनी सुचविले.

व्हिडिओ पत्रकार परिषदेत बोलताना गांधी असेही म्हणाले की, मी देशातील व परदेशातीलही अनेक तज्ज्ञांशी बोललो. त्यांचेही म्हणणे असेच आहे. ‘लॉकडाउन’मुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करायला थोडी उसंत मिळते, एवढेच. ते असेही म्हण़ाले की, विषाणूपासून बचाव करण्याच्या नादात आपण देशाची अर्र्थव्यवस्था खड्ड्यात घालू शकत नाही. अशा प्रकारच्या साथीला रोखता येत नसते. ती पद्धतशीरपणे हाताळावी लागते.ते पुढे म्हणाले की, ‘लॉकडाउन’ उठवितानाही विचारपूर्वक धोरण ठरवायला हवे. त्यासाठी तपासण्या हा मार्ग अनुसरावा लागेल. ‘हॉटस्पॉट’ व बिगर ‘हॉटस्पॉट’ असे वर्गीकरण करून चाचण्यांचा वेग वाढवावा लागेल.‘लॉकडाउन’ वाढविल्याने आधीच अडचणीत असलेल्या स्थलांतरित कामगारांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. उपासमार ही त्यांची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने धान्याची कोठारे खुली करायला हवीत, असेही त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.ही भांडण्याची वेळ नाहीराहुल गांधी असेही म्हणाले की, अनेक बाबतीत माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असू शकतात. पण ही वेळ ते मतभेद उगाळत भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी