शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

Lockdown News: दिल्लीपाठोपाठ आंध्रातही मद्यावर कर; दुकानाबाहेर तळीरामांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:21 IST

छत्तीसगड, पंजाब, प. बंगालची ‘होम डिलिव्हरी’; आंध्रात मोजावी लागेल ७५% जादा रक्कम

नवी दिल्ली : सुमारे दीड महिना बंद राहिलेली मद्याची दुकाने प्रथमच उघडल्यानंतर देशातील जवळपास सर्व राज्यांत हजारो तळीरामांची झुंबड उडाल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पुरता बोजवारा उडाला. त्यातून मार्ग काढण्यासाठी दिल्ली, आंध्र प्रदेश व छत्तीसगढ या राज्यांनी भिन्न उपाय जाहीर केले, तर छत्तीसगड, पंजाब, पश्चिम बंगालने मद्याची आॅनलाईन विक्री सुरू केली आहे.

दिल्लीमध्ये सरकारच्या चार महामंडळांमार्फत चालविल्या जाणाऱ्या १७० दुकानांमधूनच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. गर्दी कमी होण्यासोबतच सरकारच्या रिकाम्या तिजोरीतही थोडे जास्त पैसे यावेत यासाठी या दुकानांतून विकल्या जाणाºया मद्यावर छापील किमतीच्या सरसकट ७० टक्के ‘विशेष कोविड-१९’ कर आकारणी सुरू केली. त्यामुळे मद्य ७० टक्के महाग झाले. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशनेही मद्यावर जादा कर आकारण्याचे ठरवले. तिथे मद्यासाठी ७५ टक्के जादा रक्कम मोजावी लागेल.

यामुळे लोक थोडे कमी मद्यप्राशन करतील व शिवाय सरकारलाही महसूल मिळेल, अशी दोन्ही राज्य सरकारांची अपेक्षा आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व व्यापार-उद्योग पाच आठवडे बंद राहिल्याने दिल्ली सरकारचा ३,२०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. छत्तीसगढमध्ये राज्य सरकारच्या पणन महामंडळातर्फे फक्त ‘ग्रीन झोन’मध्ये मद्याची आॅनलाईन घरपोच विक्री करण्याची योजना जाहीर केली गेली. यासाठी महामंडळाच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व पत्त्यासह अन्य तपशील द्यावा लागेल. प्रत्येक आॅर्डरला १२० रुपये ‘डिलिव्हरी चार्जेस’ आकारण्यात येतील आणि एका वेळी जास्तीत जास्त पाच लिटर मद्याची आॅर्डर देता येईल. राजधानी रायपूर व कोरबा हे दोन जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये नसल्याने तेथे ही सोय उपलब्ध असणार नाही. राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात देणाºया काँग्रेस सरकारने महसुलाच्या मोहापायी नागरिकांना घरपोच मद्य पुरवावे हे अत्यंत लाजिरवाणे असल्याची टीका भाजपने केली व हा प्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी केली.उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी एका दिवसात १०० कोटी रुपयांहून अधिकची मद्यविक्री झाल्याचे दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखीही दारू मद्यपींनी खरेदी केली असती; पण असलेला सर्व साठा संपल्याने दुकाने लवकर बंद झाली.एरवी रोजची सरकारी विक्री ५०-६० कोटी रुपयांची होते. तिकडे आंध्र प्रदेशमध्ये तेथील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कोरोनाची साथ ओसरेपर्यंत दारूविक्री पूर्णपणे बंदच ठेवण्याची मागणी केली आहे.कर्नाटकमध्ये अनेक मद्याच्या दुकानांनी एकाच ग्राहकाला एकाच वेळी ५० हजार रुपयांहून अधिकची मद्यविक्री केल्याची बिले सोशल मीडियावर झाल्यानंतर दारूबंदी विभागाने नियमभंगाची कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या