शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा, ओदिशातही आता लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:08 IST

रुग्ण वाढताहेत : आरोग्य सेवेवर कमालाची ताण

चंदीगड : हरयाणात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे रविवारी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तीन मेपासून एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा केली. तत्पूर्वी, गुरुग्राम, फरिदाबाद, पंचकुला, सोनिपत, रोहटक, करनाल, हिसार आणि फतेहाबाद जिल्ह्यांत रात्री दहापासून सकाळी पाच वाजेपर्यंत शुक्रवारपर्यंत वीकेंड संचारबंदी सोमवारी लागू केली होती. तीन मेपासून संपूर्ण राज्यात  सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची माहिती गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विटरवर दिली.

हरयाणात शनिवारी कोविडमुळे १२५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण मृतांची संख्या ४३४१ झाली, तर १३,५८८ नवे रुग्ण नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५ लाख १ हजार ५६६ झाली. रुग्णांत मोठी वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले असून रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली होती. कोरोनाची सध्याची परिस्थिती ही काळजी करण्यासारखी असल्याचे विरोधी पक्षांनीही म्हटले. परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलण्यात यावी, असे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांनी गुरुवारी म्हटले. 

ओदिशात कठोर निर्बंध; बाजारपेठा बंदnभुवनेश्वर : ओदिशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाच मेपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची घोषणा रविवारी राज्याचे मुख्य सचिव एस. सी. महापात्र यांनी केल्याचे अधिकृत आदेशात म्हटले आहे. nमहापात्रा यांनी ट्विटर संदेशात हा लॉकडाऊन १९ मेपर्यंत सकाळी पाच वाजेपासून लागू असेल, असे म्हटले. या लॉकडाऊनशिवाय १५ मेपर्यंत शहरी भागांत वीकेंड शटडाऊनही अमलात राहील. nशटडाऊनमध्ये वैद्यकीय दुकाने आणि रुग्णालये वगळता सगळे बंद राहील. कोणालाही एवढा कडक लॉकडाऊन नको आहे, परंतु सरकारने या महामारीत लोकांचे जीवित सुरक्षित राखण्यासाठी तो लागू केला असल्याचे महापात्रा म्हणाले. देशाच्या इतर भागांत दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच ओदिशातही वाढत आहेत. शनिवारी राज्यात ८ हजार १५ नवे रुग्ण नोंद झाले.

टॅग्स :Haryanaहरयाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या