शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown 4.0 केंद्राचा लॉकडाउन ३० जूनपर्यंत! मार्गदर्शिका प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:17 IST

टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करणार । कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र ८ जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल्स सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपल्यानंतर देशाभरातील फक्त कोरोनाबाधित ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाऊन’ सुरू ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारने शनिवारी जारी केला. ‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार पुन्हा केव्हा व कसे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत, तसेच ‘लॉकडाऊन’ नसले तरी कोरोना रोखण्यासाठी यापुढे कोणते निर्बंध सुरू राहतील, याची मार्गदर्शिकाही केंद्राने प्रसिद्ध केली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय गृहसचिवांनी यासंबंधीचे पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना रवाना केले. ‘लॉकडाऊन’ फक्त ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये लागू राहणार असले तरी, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यांना, त्याबाहेरच्या काही क्षेत्रांनाही काही वेगळे निर्बंध लागू करायचे असतील, तर तसे त्यांना करता येईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले.

‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे व्यवहार तीन टप्प्यांत खुले करण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, उपाहारगृहे व आदरातिथ्य व्यवसायाची अन्य आस्थापने आणि शॉपिंग मॉल पुन्हा खुले होतील. त्यासंबंधीची स्वतंत्र नियमावली नंतर जारी केली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात शाळा, कॉलेजे, कोचिंग क्लासेस व अन्य शैक्षणिक, तसेच प्रशिक्षण संस्था पुन्हा केव्हा सुरू करायच्या यासंबंधीचा निर्णय राज्य सरकारे सर्व संबंधितांशी चर्चा करून जुलै महिन्यात घेऊ शकतील. तिसºया टप्प्यात स्थानिक परिस्थितीचा आढावा(पान १ वरून) घेऊन आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो रेल्वेची वाहतूक, सिनेमा व नाट्यगृहे, व्यायामशाळा, मनोरंजन उद्याने, तरणतलाव, सार्वजनिक कार्यक्रमांची सभागृहे, तसेच मोठी गर्दी जमणारे धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रम पुन्हा केव्हा सुरू करायचे, याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही; परंतु हा तिसरा टप्पा जुलैमधील दुसºया टप्प्यानंतरचा असल्याने यात उल्लेख केलेल्या गोष्टी त्यानंतर म्हणजे आॅगस्टपासून पुढेच सुरू केल्या जाऊ शकतील.

आरोग्य सेतूचा वापरआरोग्य सेतू अ‍ॅपमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असल्यास पूर्वसूचना मिळण्यास मदत होते. त्यामुळे हे अ‍ॅप ती व्यक्ती व समाजासाठी ढाल म्हणून काम करते. कार्यालये व कामाच्या ठिकाणी सर्वांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा प्रशासनाने लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला द्यावा. जेणेकरून योग्य वेळेवर वैद्यकीय सावधगिरी बाळगता येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या