शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

LIVE : गुरमीत राम रहीमविरोधातील हत्‍याप्रकरणांची सुनावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 14:55 IST

साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधातील आणखी दोन हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. 

चंदिगड, दि. 16 - साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधातील आणखी दोन हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. 50 वर्षीय गुरमीत राम रहीम सध्या रोहतक जेलमध्ये बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत आहे व हत्या प्रकरणातील सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये निमलष्करी सैनिकांच्या तुकड्या आणि हरियाणा पोलिसांचं पथकदेथील तैनात करण्यात आले आहे.   साध्वी बलात्कारप्रकरणी बाबा राम रहीमला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.  सीबीआय न्यायालय आता पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येविरोधात सुनावणी सुरू आहे. हत्येच्या गुन्ह्यांसाठी जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. 

दरम्यान, वकील नवकिरण यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ड्रायव्हर खट्टा सिंह हत्या प्रकरणात जबाब देण्यास तयारी दर्शवली आहे. कोर्टासमोर जबाब देण्यास तो तयार झाला आहे. त्याचा जबाब घ्यायचा की नाही यावर 22 सप्टेंबरला कोर्ट निर्णय घेईल. नवकिरण हे खट्टा सिंहचे वकील आहेत. त्यांनी असेही सांगितले की, खट्टा सिंह यांनी घाबरुन आपला जबाब बदलला होता.  यावर खट्टा सिंह असे म्हणाले की, मला भीती वाटत होती मला आणि माझ्या मुलालाही जीवे मारण्यात येईल.कारण आम्हाला तशी धमकी मिळाली होती. 

गेल्या 14 वर्षांपासून ही प्रकरणं कोर्टात सुरू आहेत. 

या प्रकरणांबाबत जाणून घेऊया माहिती - पहिले प्रकरण - पत्रकाराची हत्या सिरसातील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून अनेकदा डेरा सच्चा सौदामध्ये होत असलेले अन्याय आणि अत्याचाराबाबत वृत्त छापत होते. डेरामध्ये सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोटही सर्वप्रथम त्यांच्याच वृत्तापत्राद्वारे करण्यात आला होता. त्यांच्या वृत्तपत्रानं एक अनामिक पत्रदेखील छापले होते. ज्यात सविस्तर माहिती देण्यात आली होती की, कशा प्रकारे सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात महिलांवर अत्याचार केले जातात. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती आणि थेट राम रहीमवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. यानंतर ऑक्टोबर 2002मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून ते आजपर्यंत रामचंद्र छत्रपती यांचा मुलगा वडिलांच्या मारेक-यांना शिक्षा व्हावी,  यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे.  

दुसरे प्रकरण - डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापकाची हत्या दुसरे प्रकरण डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य रणजीत सिंह यांच्या हत्येशी संबंधित आहे. हे प्रकरण साध्वींवर झालेल्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित आहे. रणजीत हा डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो राम रहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला राम रहीम याचे सारे कारनामे माहीत होते. त्याची 10 जुलै 2003 मध्ये हत्या करण्यात आली होती.  राम रहीम या प्रकरणातही आरोपी आहे. या दोन्ही हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम हा मुख्य सूत्रधाराच्या स्वरुपात सीबीआयनं म्हटले आहे. याप्रकरणी बाबा राम रहीमला शिक्षा व्हावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कोर्टाकडे धाव घेतली. यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं नोव्हेंबर 2003 मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. हत्या प्रकरणात सीबीआयनं 30 जुलै 2007 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. 

जन्मठेप किंवा फाशीची शिक्षाहत्येच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामुळे या प्रकरणाच्या सुनावणी संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  गुरमीत राम रहीम याला आज हत्येप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेलमध्येच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदा