Jammu Kashmir Local Terrorists List: पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडून २६ जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या या नरसंहारात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचण्यास सुरुवाती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि अतिरेक्यांवर ठोस कारावाई करण्यात आलीय. या अतिरेक्यांची घरे बॉम्बने उद्धवस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या दशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम लष्कराकडून केले जात आहे. त्यानंतर आता काश्मीर खोऱ्यात उपस्थित असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे खोऱ्यात असलेल्या दहशतवाद्यांवर लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. या यादीनुसार, काश्मीरमध्ये एकूण १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल दहशतवाद्यांवर एकामागून एक मोठी कारवाई करत आहेत. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली जात आहेत. शनिवारी पुलवामा आणि कुलगाममधील दहशतवाद्यांची घरेही आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर १४ दहशतवादी आहेत, ज्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. सोपोरमध्ये लष्करचा एक स्थानिक दहशतवादी सक्रिय आहे. तर अवंतीपुरामध्ये जैशचा एक दहशतवादी आहे. पुलवामामध्ये लष्कर आणि जैशचे प्रत्येकी दोन स्थानिक दहशतवादी आहेत. शोपियानमध्ये एक हिजबुल आणि चार लष्कर दहशतवादी आहेत. तर अनंतनागमध्ये हिजबुलचे दोन स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत.