Lionel Messi Vantara Visit Anant Ambani: फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी याचा सध्या भारत दौरा सुरू आहे. या दौऱ्यावर मेस्सी भारतातील विविध शहरांना भेटी देत आहे. मेस्सी आतापर्यंत आपल्या भारत दौऱ्यामध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि बडे राजकीय नेतेमंडळी यांना भेटला आहे. रविवारी मेस्सीची मुंबईच्या वानखेडे मैदानावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही भेटला. तसेच, क्रिकेटचे सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबाद स्टेडियममध्ये मेस्सीने ICCचे अध्यक्ष जय शाह यांच्याशीही सुसंवाद साधला. या सर्व व्यस्त कार्यक्रमानंतर बुधवारी मेस्सीने अनंत अंबानी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वनतारा येथे भेट दिली. त्यावेळी अनंत अंबानी, त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मेस्सीने सनातन धर्म व हिंदू चालरितींनुसार महाआरती, विविध हिंदू देवदेवतांची पूजा आणि शिवाभिषेक केला.
मेस्सीच्या वनतारा भेटीबाबात वनताराकडून माहिती देण्यात आली. वनताराने सांगितले की, जागतिक फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने वनताराला विशेष भेट दिली. सनातन धर्मानुसार देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन भेटीची सुरुवात करण्याची परंपरा आहे. मेस्सीच्या भेटीतून हीच सांस्कृतिक भावना दिसून आली, कारण त्याने पारंपरिक हिंदू विधींमध्ये सहभाग घेतला, वन्यजीवांचा आश्रय पाहिला आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यानच्या त्याच्या कृतींमधून तो ज्या नम्रतेसाठी आणि मानवतावादी मूल्यांसाठी ओळखला जातो, तीच मूल्ये दिसून आली. तसेच, वन्यजीव संवर्धनाप्रती असलेल्या सामायिक वचनबद्धतेतून अनंत अंबानी यांच्यासोबतचे त्याचे उबदार नाते आणि मैत्री अधोरेखित झाली.
पुढे वनताराने म्हटले आहे की, मेस्सी, त्याचा इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांच्यासोबत यांचे भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसंगीत, देवदेवतांचे आशीर्वाद आणि पवित्रतेचे प्रतीक असलेल्या फुलांची वृष्टी आणि पारंपरिक महाआरती करण्यात आली. यावेळी मेस्सीनेही मंदिरातील महाआरतीमध्येही सहभाग घेतला. त्याने अंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा आणि शिवाभिषेक केला. सर्व जीवांबद्दल आदर राखण्याच्या भारताच्या कालातीत नीतिमूल्यांनुसार त्याने जागतिक शांतता आणि एकतेसाठी प्रार्थनाही केली.
Web Summary : Lionel Messi visited Anant Ambani's 'Vantara,' participating in Hindu rituals, including a Maha Aarti and Shiva Abhishek. He explored the wildlife sanctuary, interacting with animals and caregivers. Messi also met with Sachin Tendulkar and ICC's Jay Shah during his India tour.
Web Summary : लियोनेल मेस्सी अनंत अंबानी के 'वनतारा' पहुंचे और महा आरती सहित हिंदू अनुष्ठानों में भाग लिया। उन्होंने वन्यजीव अभयारण्य का दौरा किया, जानवरों और उनकी देखभाल करने वालों से बातचीत की। मेस्सी ने सचिन तेंदुलकर और आईसीसी के जय शाह से भी मुलाकात की।