शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:37 IST

Lionel Messi : कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये 'मेस्सी मॅजिक' पाहण्यासाठी आलेले चाहते खूप नाराज झाले आहेत.

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये 'मेस्सी मॅजिक' पाहण्यासाठी आलेले चाहते खूप नाराज झाले आहेत. मेस्सीला जवळून पाहण्याचं स्वप्न घेऊन स्टेडियमवर पोहोचलेल्या चाहत्यांना फार कमी वेळेसाठी मेस्सी दिसला. त्यामुळे चाहते संतापले. मेस्सी केवळ ५ मिनिटांसाठी स्टेडियममध्ये आला आणि लगेच परत गेला, ज्यामुळे सॉल्ट लेक स्टेडियममध्ये जमलेले चाहते खूप संतापले, हिंसक झाले. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये बॉटल्स, बेल्ट आणि खुर्च्या फेकल्या, तसेच होर्डिंग्जची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला.

मेस्सी सकाळी ११:१५ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला होता, पण तो लवकर स्टेडियममधून निघून गेला. एका चाहत्याने एनडीटीव्हीशी बोलताना हा कार्यक्रम "पूर्णपणे लाजिरवाणा"असल्याचं म्हटलं कारण मेस्सीने स्टेडियममध्ये पूर्ण फेरी मारली नाही. दुसऱ्या एका चाहत्याने सांगितलं, फारच वाईट इव्हेंट होता, तो फक्त अवघ्या काही मिनिटांसाठी आला. सर्व नेते आणि मंत्री त्याला घेरून उभे राहिले. आम्हाला काहीही पाहता आलं नाही.

मेस्सी ५ ते १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. एवढा पैसा आणि वेळ वाया गेला. आम्ही काहीही पाहू शकलो नाही असं चाहते म्हणत आहेत. इतकंच नाही तर चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला आहे. चाहते आत घुसून स्टेडियमचं नुकसान करत आहेत. याचे व्हि़डीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. 

मेस्सीने अनेक व्यक्तींची भेट घेतली. फिफा विश्वचषक जिंकणारा मेस्सी कोलकातामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि तीन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी संध्याकाळी हैदराबादसाठी रवाना होईल. चाहत्यांचा हा संताप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Messi's brief Kolkata visit sparks fan fury, stadium vandalism.

Web Summary : Fans enraged by Messi's fleeting Kolkata appearance trashed the stadium. Disappointed at his five-minute presence, they threw chairs and damaged property, expressing their anger over the event's poor organization and limited interaction.
टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉल