शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

पोस्टला ‘लाइक’ करणे हा गुन्हा होत नाही; हायकोर्टाचा निर्णय, कलम ६७ अंतर्गत गुन्हा ठरत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 08:27 IST

या पोस्टमध्ये राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी कलेक्टर कार्यालयासमोर जमण्याचे आवाहन करण्यात आले होते

डॉ. खुशालचंद बाहेतीप्रयागराज : सोशल मीडियावरील पोस्टला केवळ ‘लाइक’ केल्याने ती पोस्ट प्रसिद्ध केली किंवा पाठविली गेली, असे समजता येणार नाही, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.

इमरान खान यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने चौधरी फरहान उस्मान यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला ‘लाइक’ केल्याचा आरोप होता. या पोस्टमध्ये राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी कलेक्टर कार्यालयासमोर जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोस्टमुळे ६०० ते ७०० लोक जमले आणि त्यांनी विनापरवानगी मोर्चा काढला, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 

न्यायालयाने गुन्हा रद्द केलामाहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत केवळ लैंगिक किंवा अश्लील स्वरूपाच्या मजकुरावरच कारवाई केली जाऊ शकते. ‘लासिव्हियस’ किंवा ‘प्रुरियंट इंटरेस्ट’ या शब्दांचा अर्थ लैंगिक इच्छा किंवा आकांक्षेशी संबंधित असतो, त्यामुळे अन्य प्रकारचा भडकावू मजकूर या कलमाच्या कक्षेत येत नाही,” असे म्हणत न्यायालयाने गुन्हा रद्द केला. हा निर्णय सोशल मीडियावरील निष्क्रिय सहभाग व सक्रिय प्रसार यामधील फरक स्पष्ट करतो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ चे मर्यादित स्वरूप अधोरेखित करतो.

न्यायालयाचे म्हणणे...गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल झाली. एखादी पोस्ट ‘प्रकाशित’ तेव्हा समजली जाते जेव्हा ती प्रत्यक्ष पोस्ट केली जाते आणि ‘प्रसारित’ तेव्हा समजली जाते जेव्हा ती शेअर किंवा रिट्विट केली जाते. केवळ ‘लाइक’ करणे या दोन्ही क्रियांमध्ये मोडत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांनी नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, हा आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत किंवा इतर कोणत्याही फौजदारी खटल्याचा भाग नाही. प्रक्षोभक सामग्रीच्या संदर्भात आयटी कायद्याचे कलम ६७ लागू केले जाऊ शकत नाही.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय