शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या विद्यार्थ्यानं मृत्यूनंतर 4 जणांना दिलं जीवनदान

By admin | Updated: July 4, 2017 13:45 IST

इंदुरमधील एका 20 वर्षीय मेडिकल विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करुन 4 जणांना जीवनदान दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
इंदुर, दि. 4 - रस्ते अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या 20 वर्षीय मेडिकल विद्यार्थ्याचं उपचारादरम्यान ब्रेन डेड झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. प्रियांक गुप्ता असे या मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रियांकनं या जगाचा कायमचा निरोप जरी घेतला असला तरीही जाण्यापूर्वी तो चार जणांना जीवनदान देऊन गेला आहे.   
 
अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहन देणारी स्वयंसेवी संस्था "मुस्कान"चे कार्यकर्ते संदीपन आर्य यांनी सांगितले की, 26 जूनच्या रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियांक गुप्ताला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हॉस्पिटलमधील डॉक्टर त्याची सर्व प्रकारे योग्य ती काळजी घेत होते. मात्र अखेर 3 जुलैला प्रियांकला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. 
 
संदीपन आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक मूळचा मध्य प्रदेशातील दमोह येथील रहिवासी होता. इंदुरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. पण रस्ते अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रियांकच्या कुटुंबीयांना अवयव दानाची माहिती देण्यात आली. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांनी प्रियांकचे अवयव दान करण्यासाठी तयारी दर्शवली.
 
आर्य यांनी सांगितले की, सोमवारी (3 जुलै) रात्री प्रियांकचे हृदय एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले तर इंदुरमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील तीन रुग्णांच्या शरीरात त्याचे यकृत आणि दोन्ही किडनी यांचे प्रत्यारोपण करण्यात आले.  प्रियांकचे दोन्ही डोळे आणि त्वचा वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आले असून याद्वारे आणखी दोन जणांना नवीन आयुष्य मिळू शकणार आहे. 
 
आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरमध्ये गेल्या 20 महिन्यात ब्रेन डेड झालेल्या 21 जणांचे अवयव दान करण्यात आले आहेत. यात हृदय, यकृत, किडनी, डोळे आणि त्वचा यांच्या प्रत्यारोपणानं इंदुरसहीत दिल्ली, हरियाणा आणि मुंबईतील जवळपास 120 रुग्णांना नवं आयुष्य मिळालं आहे.