शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोतीलाल व्होरा यांचे आयुष्य हे जनसेवेचे आदर्श उदाहरण- सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 07:51 IST

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांनी सांगितले की, त्यांनी केलेले नि:स्वार्थ कार्य व बहुमोल मार्गदर्शन यांची उणीव यापुढे आम्हाला नेहमीच जाणवत राहिल.

नवी दिल्ली : मोतीलाल व्होरा यांचे आयुष्य हे जनसेवा व काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा यांचे आदर्श उदाहरण होते असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. मोतीलाल व्होरा यांच्या निधनामुळे छत्तीसगढ सरकारने सोमवारपासून २३ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.सोनिया गांधी यांनी सांगितले की, त्यांनी केलेले नि:स्वार्थ कार्य व बहुमोल मार्गदर्शन यांची उणीव यापुढे आम्हाला नेहमीच जाणवत राहिल.मोतीलाल व्होरा यांच्या निधनामुळे छत्तीसगढ सरकारतर्फे पाळण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या दुखवट्यात शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणले जातील. या कालावधीत कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. 

कुशल प्रशासक असलेले नेता : विजय दर्डालोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी म्हटले आहे की, काँग्रेसची पाळेमुळे जनमाणसात घट्ट रुजविण्यात मोठा हातभार असलेले ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. आमचे बाबूजी, स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यासमवेत मोतीलाल व्होरा यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मोतीलाल व्होरा यांनी माझ्या राजकीय जीवनात केलेले मार्गदर्शन व दिलेले अपार प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. व्होरा यांच्याशी राजकीय विषयांवर माझ्या प्रदीर्घ चर्चा होत असत. ते एक कुशल प्रशासक व काँग्रेसचे सच्चे, समर्पित अनुयायी होते. ९० वर्षे वय झाल्यानंतरही मोतीलाल व्होरा दररोज काँग्रेस मुख्यालयात येऊन कामकाज पाहत असत. ते अनेक वर्षे काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. मोतीलाल व्होरा यांनी गांधी घराण्याच्या इंदिरा गांधी यांच्यापासून राहुल गांधींपर्यंतच्या तीन पिढ्यांपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले. आपल्यावरील जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावल्या. मोतीलाल व्होरा या सत्पुरुषाच्या आत्म्याला सद्गती लाभो. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

काँग्रेसचे एकनिष्ठ अनुयायी : राजेंद्र दर्डालोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी म्हटले आहे की, मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे एकनिष्ठ अनुयायी होते. महाराष्ट्रात मी ज्यावेळी मंत्री होतो, त्यावेळी ते काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी होते. आम्ही केलेल्या कामांचा ते नित्यनियमाने आढावा घेत असत. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस