सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. एलआयसीने विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२५ आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एलआयसीची अधिकृत वेबसाइट licindia.in येथे भेट द्यावी.
या भरती अतंर्गत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO Generalist: जागा-३५०), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO Insurance Specialist: जागा- ३१०), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO (CA): जागा-३०), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO (CS): जागा- १०), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO (Actuarial): जागा- ३०), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO (Legal): जागा-३०), सहाय्यक अभियंता (AE Civil): जागा-५०) आणि सहाय्यक अभियंता (AE Electrical) पदासाठी ३१ जागा भरल्या जाणार आहेत.
पात्रतासहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO Generalist) आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO (Actuarial) या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. याशिवाय, काही पदांसाठी, उमेदवाराकडे ५ वर्षांचा कामाचा अनुभव असलेली बॅचलर पदवी/सीएसह बॅचलर पदवी, सीएसमध्ये बॅचलर पदवी इत्यादी असणे आवश्यक आहे. यासोबतच, एएओ पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार एलएलबी उत्तीर्ण असावा आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात बीई/बीटेक उत्तीर्ण असावे.
अर्ज शुल्कजनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ७०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर, एससी, एसटी आणि पीएस प्रवर्गासाठी शुल्क ८५ रुपये आहे. जीएसटी शुल्क शुल्कासोबत स्वतंत्रपणे जमा करावे लागेल.
अर्ज प्रक्रिया- सर्वात प्रथम, उमेदवारांनी ibpsonline.ibps.in/licjul25/ या पोर्टलला भेट द्या.- होम पेजवर Click here for New Registration हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.- पुढे आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.- यानंतर, इतर तपशील भरून फॉर्म भरा.- स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करा.- शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. तसेच त्याची प्रिंटआऊट काढून घ्या.