लुईस बर्गर कंपनीने दिला खोटो अहवाल महामार्ग शहरातूनच योग्य: शिरीष बर्वे यांनी दिले नितीन गडकरी यांना निवेदन
By admin | Updated: February 7, 2016 00:59 IST
जळगाव : नही ने काळ्या यादीत टाकलेल्या लुईस बर्गर या कंपनीने महामार्ग शहराबाहेरून नेण्यासंदर्भात दिलेला अहवाल खोटा असून या अहवालावर विश्वास न ठेवता प्रस्तावित वळण रस्ता थांबवून सध्याच्या महामार्गावरूनच समांतर रस्त्यासह हे काम केले जावे अशी मागणी करणारे निवेदन आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व राज मार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.
लुईस बर्गर कंपनीने दिला खोटो अहवाल महामार्ग शहरातूनच योग्य: शिरीष बर्वे यांनी दिले नितीन गडकरी यांना निवेदन
जळगाव : नही ने काळ्या यादीत टाकलेल्या लुईस बर्गर या कंपनीने महामार्ग शहराबाहेरून नेण्यासंदर्भात दिलेला अहवाल खोटा असून या अहवालावर विश्वास न ठेवता प्रस्तावित वळण रस्ता थांबवून सध्याच्या महामार्गावरूनच समांतर रस्त्यासह हे काम केले जावे अशी मागणी करणारे निवेदन आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व राज मार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातून सध्या जात असलेला राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण ६० मीटर एवढा भरत असताना तो संपूर्ण विकसित न करता परदेशी सल्लागार समिती लुईस बर्गरच्या अपुर्या माहितीच्या आधारावर दिलेल्या अहवालावरून नही ही संस्था बेजबादारपणे राष्ट्रीय महामार्ग केवळ २४ आणि ४० मीटर इतकाच भरतो असा खोटा अहवाल घेऊन तो शहराबाहेरून वळवावा लागेल असे खोटे चित्र तयार करून आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. कोट्यवधीची सुपीक जमीन यासाठी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बांधित शेतकर्यांनी या विरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. लवादाने याप्रकरणी रस्त्याच्या जागेसंदर्भातील लांबीरुंदीसह व त्यावरील वाहतुकीच्या प्रमाणासह विस्तृत अहवाल तीन महिन्यात मागविला होता. तसेच असेही निर्देश दिले होते की हा रस्ता व नियोजित बायपास यांना सारखेच प्राधान्य दिले जावे व त्यानुसारच कार्यवाही व्हावी. याप्रश्नी जिल्हाधिकार्यांनी या निर्देशांप्रमाणे कामे होतात की नाही यावर लक्ष द्यावे.