शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

याच व्यासपीठावरून गर्जना करू; राकेश टिकैत यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:50 IST

Rakesh Tikait : शेतकरी आंदोलनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय गाठले. अर्थात आज ७० दिवस झालेत. परंतु मोदी सरकार अद्याप तोडगा काढू शकले नाही. आता तर या आंदोलनात पुन्हा चैतन्य आले आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय गाठले. अर्थात आज ७० दिवस झालेत. परंतु मोदी सरकार अद्याप तोडगा काढू शकले नाही. आता तर या आंदोलनात पुन्हा चैतन्य आले आहे. गाजीपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. संयुक्त किसान मोर्चाने उद्या ६ फेब्रुवारीला देशभर चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राकेश टिकैत यांनी आम्ही याच व्यासपीठावरून गर्जना करू हिंमत असेल तर अडवा, असे सरकारला आव्हान दिले.गेल्या सहा दिवसांमध्ये आंदोलनाचे संपूर्ण चित्र बदलले आहे. २६ जानेवारीला झालेल्या घटनेला जबाबदार धरल्याने शेतकरी पुन्हा पेटून उठले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत प्रचंड रोष असून यापुढचे आंदोलन अत्यंत विचारपूर्वक करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. खा. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समवेत दहा विरोधी पक्षातील १५ सदस्य आज सकाळी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाजीपूर सीमेवर गेले; परंतु त्यांचा मार्ग चुकला. पोलिसांनी उभारलेल्या अडथळ्यांच्या ठिकाणी त्यांची बस पोहचली त्यामुळे त्यांना आंदोलनस्थळी पोहचता आले नाही.  शेतकऱ्यांच्या समस्या या नेत्यांनी ऐकूण घेतल्यात. शिवाय लोकसभेत या विषयावर आवाज उठवणार असल्याचे आश्वासन खा. सुळे यांनी दिल्याचे संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले. नव्या कृषी कायद्यांचे अमेरिकेने केले समर्थनवॉशिंग्टन : नव्या कृषी कायद्यांना अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. या कायद्यांमुळे भारतीय बाजारपेठेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही त्या देशाने म्हटले आहे.  अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, या कृषी कायद्यांमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक येण्यासही मदत होणार आहे.  शांततापूर्ण पद्धतीने चाललेली निदर्शने हे कोणत्याही लोकशाही देशाचे वैशिष्ट्य आहे. या कायद्यांबाबत असलेल्या मतभेदांवर संबंधित लोक चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढू शकतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही असेच म्हटले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, भारतीय बाजारपेठेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन