शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

By admin | Updated: October 5, 2016 05:45 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले व ३८ दहशतवाद्यांना ठार मारले. हे असे हल्ले अधूनमधून केले तरी त्यामुळे दहशतवाद्यांच्या क्षमतेचे नुकसान होणार नाही तर त्यासाठी मध्यम मुदतीच्या योजनेची गरज आहे, असे राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

सशस्त्र दलांतील वरिष्ठ व्यूहरचनाकारानेही सरकारने काश्मीरमध्ये सर्जिकल आॅपरेशनचे पडसाद उमटतील म्हणून तयार राहावे, असे सांगितले. रविवारी बारामुल्लातील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देशात इतरत्रही असे हल्ले होऊ शकतात. सर्जिकल आॅपरेशनसारख्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांचे तळही लक्ष्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी निश्चयाने मोहीम राबवावी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

दहशतवाद्यांचे नेटवर्क आता दोन पावले मागे गेले असले तरी खरोखर काही साध्य करायचे असेल तर मध्यम मुदतीची म्हणजे सहा महिन्यांची मोहीम राबवावी लागेल. एखाद्या हल्ल्याने त्यांना रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. सर्जिकल आॅपरेशनचा सूड घेण्यास पाकमध्ये असलेल्या व दहशतवाद्यांना हाताळणाऱ्यांकडून येत्या आठवड्यांत आणखी जास्त दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे भारताच्या जनरल्संना वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)