शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीय नृत्यांगना नटराज यांच्यावर धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:08 IST

तृतीयपंथी असा शब्द उच्चारला की, अनेकांच्या मनात पहिली भावना येते ती घृणेची; परंतु तृतीयपंथी हेदेखील आपल्यासारखेच माणूस आहेत व त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली पाहिजे

चेन्नई - तृतीयपंथी असा शब्द उच्चारला की, अनेकांच्या मनात पहिली भावना येते ती घृणेची; परंतु तृतीयपंथी हेदेखील आपल्यासारखेच माणूस आहेत व त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली पाहिजे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना नटराज यांच्या जीवनावरील धडा तामिळनाडूतील इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.यासंदर्भात शिक्षण विभागाचे मुख्य सचिव (अभ्यासक्रम विकास) टी. उदयचंद्रन यांनी सांगितले की, तामिळनाडूतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्येही भविष्यात भरघोस यश मिळवावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यादृष्टीनेही पाठ्यपुस्तकांतील धड्यांची आखणी करण्यात येत आहे.अकरावीच्या पुस्तकामध्ये संगीतकार इलयाराजा व आॅस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या क्षेत्राला जे योगदान दिले, त्यावरील धड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.तृतीयपंथीय असूनही निराश न होता नृत्यांगना नटराज हिने भरतनाट्यमध्ये विलक्षण प्रावीण्य मिळविले. नटराज जेव्हा अमेरिकेमध्ये नृत्याचा कार्यक्रम करण्यासाठी आली तेव्हा तिला ज्या कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागले त्याचे वर्णन या धड्यात आहे. तिने सादर केलेल्या पहिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर तृतीयपंथीय नर्तक व नृत्यांगनांकडे बघण्याची कार्यक्रम आयोजक व सामान्य लोकांची दृष्टी बदलली. ती अधिक सकारात्मक झाली. वर्तमानपत्रे किंवा नियतकालिकांमध्ये एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या कामगिरीचा परिचय देणारा लेख जसा येतो, अगदी त्याच स्वरूपात या धड्याचे लेखन केलेले आहे.नटराज यांच्यावरील धड्यासंदर्भात बोलताना टी. उदयचंद्रन यांनी सांगितले की, तामिळनाडूतील महान व्यक्तींच्या विविध मोलाच्या कामगिरीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, म्हणून सामाजिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या व्यक्तींवरील धडे समाविष्ट करण्यात आले आहेत.मनात जिद्द असेल व अंगात कलागुण असतील तर सर्व आर्थिक, सामाजिक अडथळ््यांवर मात करून यश नक्कीच मिळविता येते याचे आदर्श उदाहरणच संगीतकार इलयाराजा व ए. आर. रेहमान यांनी घालून दिले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकnewsबातम्याTamilnaduतामिळनाडू