शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदीवरील धडे वगळले, ‘सीबीएसई’पाठ्यक्रमांना कात्रीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 04:43 IST

यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी जाहीर केले होते.

नवी दिल्ली : इयत्ता ९ वी ते १२ वीच्या वर्गांच्या पाठ्यक्रमांना कात्री लावताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदी व लोकशाही हक्क यासह इतरही अनेक बाबींवरचे धडे पाठ्यपुस्तकांतून वगळले आहेत.यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यानुसार नेमक्या कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम कशा प्रकारे कमी करण्यात आला आहे, याचा तपशील ‘सीबीएसई’ने बुधवारी जाहीर केला. पाठ्यक्रमातील हा बदल फक्त यंदापुरताच लागू असेल, असे मंडळाने स्पष्ट केले.मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वगळलेले धडे वर्गात न शिकविता गरज असेल तेवढाच त्यांचा संदर्भ देण्यात यावा. वर्षभरात शाळांमध्ये घेतल्या जाणाºया परीक्षा किंवा वर्षअखेरीस मंडळातर्फे घेतल्या जाणाºया परीक्षेत या वगळलेल्या भागांवर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत, असे शाळाप्रमुख व शिक्षकांना कळविण्यात आले आहे.शिक्षणातील ज्ञानार्जनाचे महत्त्व लक्षात घेता पाठ्यक्रम कमी केला तरी विषयांमधील मूलभूत संकल्पना कायम ठेवण्याची काळजी घेण्यात आल्याचे मंत्री म्हणाले होते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे कारण देऊन पाठ्यक्रमाचा फेरआढावा घेताना या सरकारच्या काळात ज्या मुद्यांवरून आंदोलने व वाद झाले, असेच विषय नेमके वगळले जावेत, यावरून अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आहेत. मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या पाठ्यक्रम कपातीच्या संदर्भात शिक्षणतज्ज्ञांनी म्हणे एक आठवड्यात दीड हजाराहून जास्त सूचना व शिफारशी पाठविल्या होत्या. मात्र, नेमके हेच धडे वगळण्याच्या सूचना कोणाच्या होत्या, हे मात्र कळायला मार्ग नाही.नेमके काय वगळलेइयत्ता १० वी : लोकशाही आणि विविधता, लैंगिक समता, धर्म व जात, लोकचळवळी व आंदोलने आणि लोकशाहीपुढील आव्हाने.इयत्ता ११ वी : संघराज्य व्यवस्था, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता व स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व आ़णि विकास.इयत्ता १२ वी : पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ याशेजारी देशांशी भारताचे संबंध, भारताच्या आर्थिकविकासातील परिवर्तने, भारतातील सामाजिक चळवळी आणि नोटाबंदी.विविध विषयांच्यापाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणारपाठ्यक्रमाची फेररचना करण्याच्या नावाखाली संघराज्य व्यवस्था, धर्म निरपेक्षता व नागरिकत्व यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील धडे वगळण्याचा ‘सीबीएसई’च्या निर्णयास आमचा जोरदार आक्षेप आहे. काही झाले तरी हे धडे अभ्यासक्रमात राहतील, याची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने खात्री करावी.-ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र