शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बँकांच्या खासगीकरणाची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 04:17 IST

सरकार यंदा घाई करणार नाही; आर्थिक तंगीमुळे गुंतवणूकदार मिळणे कठीण

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे कराव्या लागलेल्या ‘लॉकडाऊन’ने अर्थव्यवस्था डामाडौल झालेली असताना संभाव्य कमी मूल्यांकन व अडचणीत आलेली वाढती कर्जवसुली लक्षात घेता कोणत्याही सरकारी बँकेचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया यंदाच्या वित्तीय वर्षात हाती घेतले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे माहीतगार सूत्रांनी सांगितले.इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, युनायटेड कमर्शिअल बँक आणि युनायटेड बँक आॅफ इंडिया या सरकारी क्षेत्रातील चार बँका सध्या रिझर्व्ह बँकेच्या ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन फ्रेमवर्क’खाली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कर्जवाटप, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार व संचालकांची फी यासह इतरही अनेक बाबतीत अनेक निर्बंध आहेत.त्यामुळे अशा अडचणीत असलेल्या बँका ताब्यात घ्यायला खासगी क्षेत्रातील कोणी सध्या तयार होण्याची शक्यता नसताना या बँका आता विकायला काढणे व्यापारीदृष्ट्या शहाणपणाचे होणार नाही. शिवाय बँकिंग हे महत्त्वाचे क्षेत्र असल्याने सरकार मिळेल त्या किमतीला बँका विकण्याची घाईही करणार नाही, असे या सूत्रांना वाटते.सूत्रांनी असेही निदर्शनास आणले की, सरकारी बँकांचे मूल्यांकन एवढे कमी आहे की, पूर्णपणे बँक विकणे तर सोडाच; पण गेल्या अनेक वर्षांत एकाही सरकारी बँकेने त्यांच्या भागभांडवलाचा काही हिस्साही खासगी क्षेत्रास विक्रीस काढलेला नाही. सरकारने वेळोवेळी भांडवल प्रतिपूर्तीसाठी निधी दिल्याने काही बँकांमध्ये तर सरकारी हिस्सेदारी ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.कोरोनामुळे कर्ज वसुलीला बसली खीळच्कोरोनामुळे सरकारी बँकांच्या कर्जवसुलीला खीळ बसली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक खासगी बँकांची स्थितीही तुलनेने नाजूक झाली आहे.च्वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारी बँकांना भांडवल देण्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

टॅग्स :bankबँक