शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक, केवळ 6.9 लाख लोकांनी भरला GST रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:44 IST

ऑगस्ट महीन्यातील जीएसटी रिटर्न भरण्यासाठी आता केवळ 48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 6.9 लाख करदात्यांनी जीएसटी रिटर्नचा भरणा केला आहे.  

नवी दिल्ली, दि. 19 - ऑगस्ट महीन्यातील जीएसटी रिटर्न भरण्यासाठी आता केवळ 48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 6.9 लाख करदात्यांनी जीएसटी रिटर्नचा भरणा केला आहे.  आतापर्यंत 85 लाख जणांनी जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं आहे. यापैकी  23.18 लाख नवे रजिस्ट्रेशन आहेत. तर 62.65 लाख करदाता जुन्या टॅक्स प्रणालीनुसार या नव्या करप्रणालीत सहभागी झाले आहेत. केवळ 48 तास शिल्लक असताना अवघ्या  6.9 लाख करदात्यांनी  जीएसटी रिटर्नचा भरणा केला आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी रिटर्न भरण्यासाठी मोठा गोंधळ होऊ शकतो. पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे तारीख पुढे ढकलली-जीएसटीएन पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख पुढे ढकलली. तारीख पुढे गेल्यानंतरही जीएसटी रिटर्न भरणा-यांच्या संख्येत अपेक्षित वाढ झाली नाही. इंडियन एक्सप्रेसने एका अधिका-याच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तात सोमवारपर्यंत केवळ 6.9 लाख करदात्यांनी जीएसटी रिटर्नचा भरणा केल्याचं म्हटलं आहे. जुलैमध्ये 46 लाख करदात्यांनी केला भरणा-जीएसटी नेटवर्कमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाच्या चौकशीसाठी सरकारने मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत  3.05 लाख लोकांनी ऑगस्ट महिन्यासाठी रिटर्न भरलं आहे. तर जुलै महिन्यासाठी 46 लाख करदात्यांनी जीएसटीचा भरणा केल्याची माहिती त्यांनी दिली. GSTR-3B फॉर्म भरणं गरजेचं -ऑगस्ट महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर आहे. करदात्यांना GSTR-3B हा फॉर्म भरायचा आहे. हा सिंगल फॉर्म आहे.