शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शोकांतिका! लेकींनी खाटेवरूनच आणले आईचे पार्थिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 06:53 IST

मध्य प्रदेशातील शोकांतिका : कोणीही मदत नाही केली, फक्त बघत होते

रिवा (मध्य प्रदेश) : वृद्ध आईची तब्येत बिघडल्याने  तिला इस्पितळात घेऊन जाण्यासाठी कुटुंबीयांना रुग्णवाहिका बोलावली. अनेक तास वाट पाहूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर तिच्या चार मुलींनी   आईला खाटेवर उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुर्दैवाचा  फेरा एवढ्यावरच थांबला नाही. मृत आईचे पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिका मिळाली नाही. नाईलाजाने या चार लेकी आईचे पार्थिव खाटेवर टाकून पाच किलोमीटर पायी चालत घरी परतल्या.

रिवा जिल्ह्यातील महसुआ गावातील ही शोकांतिका होय.  मोलिया केवट (८०) यांची तब्येत खूपच बिघडली होती. तिला इस्पितळात नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने तिच्या चार मुलींनी खाटेवरच आईला उचलून जवळच्या आरोग्य केंद्रात  घेऊन आल्या. डॉक्टरांनी नाडी तपासून तिला मृत घोषित केले.  कुटुंबातील लोकांनी पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिका मिळेल का म्हणून तेथील डॉक्टरांकडे चौकशी केली. परंतु, नकार मिळाल्याने खाटेवरच आईचे पार्थिव टाकून त्या ५ किलोमीटर पायी चालत घराकडे निघाल्या. वाटेत एक पोलीस ठाणे लागले; परंतु, कोणीही मदत केली नाही. सगळे फक्त बघत होते. मोटरसायकलने जाणाऱ्या काही लोकांनी हे मन हेलावणारे दृश्य पाहून व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर झळकावून व्यवस्थेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले.

एखादी शववाहिका दान करा... जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एल. मिश्रा यांनी सांगितले की, त्या आरोग्य केंद्रात शववाहिका उपलब्ध नव्हती.  व्यवस्था करण्यात वेळ लागल्याने त्या खाटेवरच मृतदेह घेऊन गावी परतल्या. संपूर्ण जिल्ह्यात एकही शववाहिका उपलब्ध नाही.  लोकांनी व्हिडीओ बनवून ते झळकावण्याऐवजी एखादी शववाहिका दान करावी, असे आवाहन डॉ. मिश्रा यांनी केले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशHaryanaहरयाणा