शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जल आराखड्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक पाण्याची पळवापळवी : उपभोगता गटाशी चर्चा व्हावी

By admin | Updated: September 15, 2015 18:49 IST

अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्‍यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्‘ात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. या जल आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीतजास्त हरकती नोंदवत कायदेशीर लढा उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्‘ातून व्यक्त होत आहे.

अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्‍यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. या जल आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीतजास्त हरकती नोंदवत कायदेशीर लढा उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
जलसंपदा विभागाने गोदावरी खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनासाठी आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्यातील ४१.५० टीएमसी पाणी मराठवाड्यात देण्याचे सुचवण्यात आले आहे. वास्तवात गोदावरी खोर्‍यात ३० उपखोरे आहेत. त्यात जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी, प्रवरा आणि मुळा ही तीन खोरे आहेत. या खोर्‍यातील अतिरिक्त पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने आराखडा तयार केला आहे. गोदावरी खोरे हे साधारण खोरे या प्रकारात मोडते. या ठिकाणी हेक्टरला तीन हजार ते आठ हजार घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जल आराखड्यातील नियमानुसार ज्या खोर्‍यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. ते दुसर्‍या खोर्‍यात वापरावे, असे स्पष्ट आहे. तरीही जिल्ह्यातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आराखड्यात पाणी वापराच्या निकषात ८० ते १०० टक्के सुक्ष्म सिंचनाखाली जिल्ह्यातील क्षेत्र आणल्यास पाणी शिल्लक राहणार आहे. हे पाणी दुसर्‍या खोर्‍यात वापरता येईल, सिंचन पाहून पिकाच्या गरजेनुुसार पाण्याचे केवळ एकच आवर्तन द्यावे, मुळा व प्रवरा खोर्‍यात शेतीवर आधारित उद्योग कमी आहेत. यामुळे येथील पाणी दुसर्‍या खोर्‍यात वळणे शक्य आहे, असे आराखड्यात सुचवण्यात आले आहे. मात्र, ज्या भागात शेतीवर आधारित उद्योगच कमी आहेत. पर्यायाने त्या ठिकाणी मुख्य व्यवसाय शेती असल्याने तेथे जादा पाणी देणे आवश्यक असतांना त्या ठिकाणी असणारे पाणी काढून घेण्याचा डाव आहे. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच आराखड्यातील बाबींमध्ये विसंगती आहेत.
जिल्ह्यात पाणी बचाव समिती स्थापन झालेली आहे. पाण्यासाठी संघर्षाची हाक देण्यात आली आहे. या आराखड्या विरोधात संतापासोबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक आहे. जलसंपदा विभागाने उपभोगता गटाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीत जास्त हकरती नोंदवणे आवश्यक बनले आहे.
............अपूर्ण.............