शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

झेंड्याच्या दोरीपासून आमदार दूरच शासनाचे घूमजाव : प्रशासनाकडून झेंडावंदन

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

मिलिंदकुमार साळवे / लोकमत विशेष वृत्त

मिलिंदकुमार साळवे / लोकमत विशेष वृत्त
श्रीरामपूर : आमदारांच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्रदिनी १ मे रोजी राज्यातील आमदारांच्या हस्ते झेंडा फडकविण्याचा निर्णय घेऊन त्यांना मान दिला. पण अडीच महिन्यातच सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या झेंड्याच्या दोरीपासून आमदारांना पुन्हा दूर ठेवण्यात आले.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनीही आमदारांना प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन व महाराष्ट्र दिनासारख्या कार्यक्रमांमध्ये झेंडावंदन करण्याचे अधिकार देण्याची मागणी केली होती. विखे १५ वर्षे सत्तेत असताना मात्र त्यांच्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नव्हता. नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या अनेक वर्षांपासूनच्या जुन्याच मागणीची दखल घेत महाराष्ट्र दिनाचे सरकारी झेंडावंदन त्यांच्याहस्ते करण्याचा मान दिला.
पण हा मान औटघटकेचा राहिला. महाराष्ट्रदिनी राज्यातील तालुका ठिकाणी आतापर्यंत तहसीलदारांच्या हस्ते होणारे झेंडावंदन आमदारांच्याहस्ते करण्याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक यांनी यांच्या सहीने सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार महाराष्ट्र दिनाच्या सरकारी झेंडावंदनाची दोरी ओढण्याचा मान आमदारांना मिळाला.
स्वातंत्र्यदिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्याहस्ते ठेवण्यात आले होते. तर उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालयी प्रांताधिकारी व तहसीलदारांच्याहस्ते करण्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने स्पष्ट केले होते. त्यामुळे महाराष्ट्र दिनी सरकारी ध्वजारोहणाचा मान मिळालेल्या आमदारांना शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाची दोरी ओढण्यापासून दूर ठेवण्यात आल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे.