शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार मुलांना सुखरूप सोडले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:38 IST

मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाºया आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाºया आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या महिला उप निरीक्षकांमुळे एक हजार घरांना त्यांची हरवलेली मुले मिळाले आहेत. आम्हाला अशी आशा आहे की, रेखा मिश्रा यांची प्रेरणा घेऊन अन्य रेल्वे स्टेशनांवरही आरपीएफ आणि अन्य स्थानिक पोलीस याच प्रकारचे कार्य करतील. आम्ही लवकरच रेखा यांचा यथोचित सन्मानित करणार आहोत. त्यासाठी रेल्वेलाही सूचना दिली आहे.आरपीएफ महासंचालकांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, रेखा शर्मा मूळच्या उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या आहेत. त्या २०११ च्या बॅचच्या आरपीएफ उप निरीक्षक आहेत. प्रशिक्षणानंतर त्या २०१४ पासून नियमित सेवेत आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईत झाली. एक वर्ष त्या महिला सुरक्षा दलात होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांना नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांनी आतायर्पंत ९५३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहचविले आहे. आरपीएफचे महासंचालक अशा कर्मचाºयांना प्रोत्साहन देतात.>रेखा शर्मा यांचा आनंद द्विगुणितरेल्वे बोर्ड आरपीएफ कार्यालयाने सांगितले की, रेखा शर्मा यांच्यासाठी हा पुरस्कार आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे; कारण या मार्चमध्ये त्यांचा साखरपुडाही आहे. याबाबत रेखा शर्मा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, नियमांचा हवाला देत त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.