शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:07 IST

- सुरेश भुसारी नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा डाव्यांची सत्ता आली असून, ...

- सुरेश भुसारीनवी दिल्ली : देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा डाव्यांची सत्ता आली असून, त्यात एका मराठी युवकाने आपली नाममुद्रा उमटविली आहे. मूळचा नागपूरचा असलेला साकेत मून उपाध्यक्षपदी निवडून आलाआहे.जेएनयूमध्ये डाव्या पक्षाचा प्रभाव असलेल्या स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) वर्चस्व कायम राहिले आहे.साकेतला सर्वाधिक ३,३६५ मते (५८.७ टक्के ) मिळाली. साकेतने अभाविपच्या श्रुती अग्निहोत्रीचा पराभव केला.अध्यक्षपदी निवडून आलेल्या एशे घोष हिला ४०.४ टक्के मते मिळाली. संयुक्त सचिवपदी निवडून आलेल्या मोहम्मद दानिश याला ५७.५ टक्के मते मिळाली आहेत.जवळपास १५ वर्षांनंतर मराठी विद्यार्थ्याला जेएनयूमध्ये यश मिळाले आहे. नागपुरातून पदवी घेतलेल्या साकेतने एम. ए. करण्यासाठी जेएनयूची वाट धरली. एम. फिल. केल्यानंतर तो पीएच. डी. करीत आहे.>लढा सुरू राहीलनागपुरातील दलित चळवळीचा वारसा लाभलेल्या साकेत मूनने ‘लोकमत’ला सांगितले की, जेएनयूला देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. मात्र या संस्थेची बदनामी करण्याचे कारस्थान गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे.सध्या सरकारमध्ये बसलेल्या व्यक्ती त्यात सहभागी आहेत. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही व तुकडे-तुकडे गँगचे म्हणून हिणवले जात आहे; पण या लोकांविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.