शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

आसामात कमळ केरळात डावे

By admin | Updated: May 20, 2016 09:22 IST

पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. आसाममध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. या पक्षाने भगवा उंचावत काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवली. तामिळनाडूत जयललितांनी निसटती का होईना, लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प. बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करण्याचा प्रयोग फसला. बंगालमध्ये काँग्रेसशी समझोता करणाऱ्या डाव्या पक्षांनी (एलफडीएफ) ने केरळमध्ये तर काँग्रेसला सत्तेतूनच हटवले आहे.पुडुच्चेरीमधील मिळवलेली सत्ता हेच काय ते समाधान काँग्रेसला लाभले. आसाममधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किती मोठा होता हे त्यांच्या टिष्ट्वटमधून दिसून आले. देशभरातील जनता भाजपावर विश्वास दाखवत आहे. सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर जनतेने दाखविलेला हा विश्वास असल्याचे पक्षाला वाटते, असे ते निकाल जाहीर होत असताना प्रतिक्रिया देताना म्हणाले. >मोदींच्या कामगिरीला पावतीदेशाने काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येयधोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे यातून दिसून येते. - अमित शहा, भाजपाध्यक्ष>जनतेचा निर्णय स्वीकारतोकाँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेपर्यंत कठोर मेहनत करेल. आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीत विजयी पक्षांना शुभेच्छा देतो. - राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस>भ्रष्ट सरकारला धोबीपछाडकेरळातील विजय एलडीएफसाठी मोठा आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला धोबीपछाड दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे. - प्रकाश करात, माकपा नेते>ममतांचा विजय ऐतिहासिक...ममतांच्या तृणमूलने २०११मध्ये २९४पैकी १८४ जागा जिंकल्या होत्या. या वेळी या पक्षाने दुहेरी द्विशतकच पार केले. गेल्या वेळी तृणमूलशी युती करणाऱ्या काँग्रेसने प. बंगालमध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी तृणमूलने स्वबळावर मिळविलेले यश ऐतिहासिक ठरते.भाजपाने आसाममध्ये केलेली निवडणूकपूर्व आघाडी कामी आल्याचे पाहता पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या राज्यांमध्ये तशाच प्रकारची रणनीती अवलंबली जाऊ शकते. राहुल गांधी यांचा आसाम आणि प. बंगालमधील प्रयोग पुरता फसल्यामुळे काँग्रेसला अधिक आत्मचिंतनाची गरज भासेल.>तामिळनाडूत भोपळाच, तरीही जयललितांची साथ!तामिळनाडूत भाजपाला या वेळीही खाते उघडता आले नाही, मात्र या पक्षाने केरळमध्ये प्रथमच पाय रोवले. प. बंगालमध्ये संख्याबळ वाढविले. जयललितांच्या विजयामुळे भाजपाला संसदेत अण्णाद्रमुकची साथ लाभेल.प. बंगालचा विकास डोळ्यांसमोर ठेवत ममता बॅनर्जीही या पक्षाला मदतीचा हात देऊ शकतात. जयललितांनी गेल्या वेळी २३४पैकी १५० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांचे संख्याबळ घटले आहे.