शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या जाणून घ्या 'या' सात गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 07:45 IST

आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची 148 वी जयंती. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे.

मुंबई - आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची 148 वी जयंती. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे. सर्व धर्म समभाव, हिंदुत्व व समाजवाद या तीनही विचारधारांचा योग्य समन्वय करून त्यांनी भारताला सुयोग्य अशा राष्ट्रीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला तसेच जगातील इतर देशांसाठीही अशा प्रकारच्या शांततामय सहजीवनाचे उद्दीष्ट असणार्‍या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास उद्युक्त केले. त्यांची मानवता, निसर्ग, आपला स्वतःचा धर्म यावरील श्रद्धा, जीवनातील साधेपणा व अहिंसेवरील गाढा विश्वास यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व स्थलकालातीत आदर्श बनले आहे. अहिंसक सामाजिक चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांच्या जीवनाची महान उपलब्धी होती. या यशामुळे अहिंसक मार्गाच्या क्षमतेला नवी ताकद मिळाली व कोणत्याही सामाजिक, आर्थिक, राजकीय वा पर्यावरणीय व्यवस्थेतील बदलासाठी ते एक प्रभावी, सर्वमान्य व विधायक साधन बनले. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या या सात गोष्टी..कदाचीत त्या तुम्हाला माहित नसतील.

- शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी गांधीजींचे नाव पाच वेळा नोबेल समिती समोर आले होते. मात्र त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांना नोबेल पुरस्कार न मिळाल्याची खंत पुरस्कार समितीने व्यक्त केली होती. 

- भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजी आयुष्यभर लढले. ब्रिटिशांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले.

- महात्मा गांधी यांची अंतयात्रा ही 8 किलोमीटर लांब होती. जवळजवळ 10 दशलक्ष लोकं अंतयात्रेत सहभागी झाले होते. 

- गांधीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पत्रे लिहीली आहेत. यात हिटलर, टॉल्सटॉय आणि आइन्स्टाइन यांचा समावेश आहे. 

- भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संविधान सभेत पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणादरम्यान गांधीजी उपस्थित नव्हते.

- महात्मा गांधीयांच्या मृत्यृवेळी त्यांनी परीधान केलेले कपडे आजही संग्रालयात सुरक्षीत ठेवण्यात आले आहेत.

- अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा पगडा होता. गांधीजींना सन्मान देण्यासाठी म्हणून गोल फ्रेमचा चश्मा वापरत. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी