अवकाळी पावसाचा फटका : राजधानी दिल्लीत महागाईचा भडकानवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे येथील गेल्या पाच दिवसांत भाजीमंडईत पालक, कोबी, गाजर आणि वाटाण्याच्या शेंगांचे भाव ६७ टक्क्यांनी वधारले आहेत.भाज्यांचा घाऊक बाजार होळीनिमित्त शुक्रवारी बंद राहणार असून पुरवठाही जेमतेमच असल्यामुळे येते दोन दिवस भाज्यांचे भाव चढेच राहतील असा अंदाज आहे. बटाटे आणि कांद्याचा पुरवठा पुरेसा असल्यामुळे त्याचे भावही स्थिर आहेत, असे केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे काही भाजीपाल्याचे पीक बाहेर काढण्यास उशीर झाला. पालेभाज्यांचे भाव ३०-३५ टक्के, तर अन्य भाज्यांचे भाव २०-५० टक्के वाढले, असे अझादूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र कुमार यांनी सांगितले.स्मॉल फार्मर्स अॅग्रिकल्चर-बिझनेस कॉन्सॉर्टियमचे व्यवस्थापकीय संचालक प्रवेश शर्मा म्हणाले की, कांदे आणि बटाट्याच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. शेतकरी शेतातील साचलेले पाणी बाहेर काढत असून शेतात हालचाल करता येत नसल्यामुळे काही भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. मदर डेलीच्या दुकानात गुरुवारी बटाचे ११.९०, तर कांदे ३० रुपये किलोने विकले गेले. एवढेच काय फिरत्या विक्रेत्यांनीही जवळपास याच भावात या दोन भाज्या विकल्या. मात्र पालेभाज्या व ज्या भाज्या हिवाळ्यात येतात त्यांचे भाव एकदम उसळले. जो बाजार संघटित नाही तेथे भाज्यांचे भाव निरनिराळे राहिले.४नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याचा परिणाम पालकाचा पुरवठा मंडीत होऊ शकला नाही. होळीनंतर शेतकरी पुन्हा भाज्यांचे पीक काढतील तेव्हा पुरवठा वाढेल, असे ओखला मंडईतील व्यापाऱ्याने सांगितले.
पालेभाज्या कडाडल्या
By admin | Updated: March 5, 2015 23:05 IST