........... एलबीटी बातमीस जोड...........
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
फिप्टी पूर्ण होणार...
........... एलबीटी बातमीस जोड...........
फिप्टी पूर्ण होणार...एलबीटी लागू झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत लातूर महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून ३० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. आता राज्य शासनाने एलबीटीची वसुली वाढविण्यासाठी व्याज व दंडमाफी केल्याने लातूर महापालिकेत सभासदांची संख्या वाढली. तीन हजारांहून चार हजारांवर सदस्य गेले आहेत. गुरुवारी व्यावसायिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, शुक्रवारी गर्दी लक्षात घेऊन मनपाने तयारी सुरू केली आहे. लातूर महापालिकेला एलबीटीतून जवळपास किमान ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ४० कोटींचा आकडा पार केलेल्या लातूर महापालिकेच्या एलबीटी विभागाची शेवटच्या दिवशी जणू कसोटीच आहे. एका दिवसात दहा कोटी रुपये जमा होतील, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.