शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी पंडितांच्या मोर्चावर लाठीमार; हत्येनंतर तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:58 IST

पंडिताच्या हत्येनंतर तणाव : कारवाईचा नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीकडून निषेध

श्रीनगर : काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यामध्ये राहुल भट (३५ वर्षे) या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गुरुवारी हत्या केली होती. त्याच्या निषेधार्थ काश्मिरी पंडितांनी शुक्रवारी काढलेला निषेध मोर्चा श्रीनगर विमानतळाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी या निदर्शकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेने काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला असून, मोर्चावरील पोलीस कारवाईचा काश्मिरी पंडितांनी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांनी निषेध केला आहे.

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ काश्मीरच्या विविध भागांमध्ये गुरुवारपासूनच मोर्चे काढले जात आहेत.  बडगाम भागातून शुक्रवारी काश्मिरी पंडितांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला. निदर्शकांनी माघारी जाण्यास नकार दिल्याने त्यांना पांगविण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.  राहुल भट हा काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी होता. 

त्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांच्या जीविताचे रक्षण करण्यात जम्मू-काश्मीर प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप निदर्शकांनी केला. तसेच मोर्चावर केलेल्या कारवाईचाही त्यांनी निषेध केला आहे.  

लाठीमाराची कारवाई लाजिरवाणी : ओमर अब्दुल्लानॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, योग्य मागणीसाठी काश्मिरी पंडितांनी काढलेल्या मोर्चावर लाठीमार करणे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याची केलेली कारवाई ही लाजिरवाणी घटना आहे.काश्मिरी लोकांसाठी ही परिस्थिती नवीन नाही. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल काश्मिरी पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत. त्यामुळे त्याचा निषेध करण्याचा काश्मिरी पंडितांना हक्क आहे. 

पंडितांचे संरक्षण करण्यात सरकारला अपयश n    पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले की, काश्मिरी पंडितांना समर्थन देण्यासाठी बडगाम येथे जाण्यापासून पोलिसांनी मला रोखले व नजरकैदेत ठेवले. n    काश्मिरी पंडितांचे रक्षण करण्यात सरकारला अपयश आले आहे. n    काश्मिरी मुस्लीम व पंडितांनी एकमेकांच्या दु:खात सहभागी व्हावे, अशी भाजपची इच्छा नसल्यानेच मला निदर्शकांकडे जाण्यापासून रोखण्यात आले, असा आरोपही मेहबुबा मुफ्ती यांनी केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर