- हरिश गुप्ता।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०१४ मध्ये शहा यांनी हरियाणात मित्रपक्ष इंडियन नॅशनल लोकदलाला दूर सारून जाटांचे प्राबल्य असलेल्या हरियाणात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व सत्ता मिळवली. नंतर त्यांनी शब्दश: एकहाती झारखंड भाजपला मिळवून दिला. झारखंड राज्य स्थापन झाल्यापासून कधीही स्थिर सरकार त्याने पाहिले नव्हते. ते शहा यांनी दिले. या दोन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदी त्यांनी अपरिचित चेहरे दिले एवढेच नाही तर संपूर्ण पाच वर्षे ते त्या पदावर राहतील अशी व्यवस्था केली. असेच महाराष्ट्रात घडले. तेथे शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती व शहा यांनी शिवसेनेच्या दबाबाला भीक घालण्यास नकार दिला.२८८ सदस्यांच्या विधानसभेत भाजप हा सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष बनला होता. स्पष्ट बहुमताला खूपच कमी आमदार त्याला लागणार होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला विनाअट पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे शिवसेनेने नरमाईची भूमिका घेऊन भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा क्षण नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला.या जोडीने जम्मू आणि काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले व ऐतिहासिक अशी घटना घडवली. तोपर्यंत अशी मोठी आघाडी आकाराला आलेली नव्हती. दुर्देवाने हा प्रयोग फार दिवस टिकला नाही. यानंतर दिल्लीत २०१५मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आणि बिहारमध्ये २०१६ मध्ये नितीश कुमार यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत भाजपला अपमानास्पद पराभव पत्करावा लागला तो हा काळ अमित शहा यांच्यासाठी वाईट ठरला. आसाममध्ये अमित शहा यांना पहिले भाजपचे सरकार स्थापन करण्यात यश मिळाले.पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवला. या तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे त्यांनी दिले. हे तिन्ही मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व मनोहरलाल खट्टर यांच्यासारखेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ पदाधिकारी व कार्यकर्ते होते. पंजाबमध्ये सुरक्षा व इतर प्रश्नांमुळे भाजप-शिरोमणी अकाली दलाने आम आदमी पक्षाच्या पराभवासाठी जोरदार प्रयत्न केले आणि कॅप्टन अमरिंदरसिंग तेथे मुख्यमंत्री बनले.
भारताला मोदीनिती देणारे भाजपचे आधुनिक चाणक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 07:07 IST