लेट नाईट---हवाई हल्ल्यात ६५ ठार
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
साना (येमेन) : हाऊथी दहशतवाद्यांविरुद्ध तयाझ या शहरावर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात जवळजवळ ६५ नागरिक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सौदी अरबच्या नेतृत्वात येमेनसह मित्र राष्ट्रांनी हा हवाई हल्ला केला.
लेट नाईट---हवाई हल्ल्यात ६५ ठार
साना (येमेन) : हाऊथी दहशतवाद्यांविरुद्ध तयाझ या शहरावर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात जवळजवळ ६५ नागरिक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सौदी अरबच्या नेतृत्वात येमेनसह मित्र राष्ट्रांनी हा हवाई हल्ला केला. मृतांमधील अर्धेअधिक मुले आणि स्त्रिया असल्याचे मदतकार्यात एमएसएफ या संघटनेने म्हटले आहे. हाऊथीच्या विद्रोही गटाने येमेनच्या मोठ्या भागावर कब्जा केला. मार्चपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत चार हजार लोक मारले गेले असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.