शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षी सर्वाधिक मुले घेतली गेली दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:09 IST

देशात वर्ष २०१८-१९ मध्ये २३९८ मुलींसह ४००० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची गत पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

नवी दिल्ली : देशात वर्ष २०१८-१९ मध्ये २३९८ मुलींसह ४००० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची गत पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीने (सीएआरए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ४०२७ मुलांना दत्तक घेण्यात आले. यात जवळपास ३३७४ मुले देशात, तर ६५३ मुले देशाबाहेर दत्तक घेण्यात आली. या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये ३९२७ मुले, २०१६-१७ मध्ये एकूण ३७८८ मुले आणि २०१५-१६ मध्ये एकूण ३६७७ मुले दत्तक घेण्यात आली.महिला व बालविकास मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, लोकांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. कारण, दरवर्षी मुलांच्या तुलनेत मुली अधिक प्रमाणात दत्तक घेतल्या जातात.या आकडेवारीनुसार सर्वाधिक मुले महाराष्ट्रातून दत्तक घेण्यात आली. यात ८४५ मुले दत्तक घेण्यात आली असून, यात ४७७ मुली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येत मुले दत्तक घेण्यात आली, कारण तेथे अनाथ मुलांचा सांभाळकरणाºया, दत्तक संस्थांची संख्या अधिक आहे.>कर्नाटकही आघाडीवरमहाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर आहे. या राज्यातून २८१ मुले दत्तक घेण्यात आली. यानंतर ओडिशाचा नंबर आहे, येथून २४४ आणि मध्यप्रदेशातून २३९ मुलांना दत्तक घेण्यात आले.हरियाणातही मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेणाºयांची संख्या अधिक आहे. दत्तक घेण्यात आलेल्या एकूण ७२ मुलांमध्ये ४५ मुली आहेत. या आकडेवारीनुसार, दिल्लीत दत्तक घेण्यात आलेल्या १५३ मुलांमध्ये १०३ मुली आहेत.