नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती अजून थोडी बिघडली तरी युद्धाला तोंड फुटू शकते, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराकडून खरेदी कऱण्यात येणाऱ्या दारुगोळ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये सरकारी ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डाकडून खरेदी केलेल्या दारुगोळ्यापैकीत तब्बल ९६० कोटी रुपयांचा दारुगोळा निकृष्ट दर्जाचा होता. एवढ्या किमतीत लष्कराला तब्बल १०० आर्टिलरी गन खरेदी करता आल्या असत्या, असा दावा लष्कराच्या एका अंतर्गत अहवालात करण्यात आला आहे.लष्कराकडील हा अंतर्गत अहवाल संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या काळात जो निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला गेला त्याची किंमत जवळपास ९६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे, असे या अहवालात म्हटले होते. एवढ्या किमतीमध्ये १५०-एमएम च्या मध्यम आर्टिलरी गन खरेदी करता आला होता.ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्ड हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. तसेच ही संस्था जगातील सर्वात जुन्या सरकारी ऑर्डिनन्स प्रॉडक्शन युनिटमधील एक आहे. या अंतर्गत लष्करासाठी दारुगोळा तयार केला जातो. या ऑर्डिनन्स बोर्डाकडून मिळालेल्या २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल, १२५ एमएम टँक राऊंडसह वेगवेगळ्या प्रकारच्या कॅलिबर बुलेटचा समावेश आहे.
गेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा
By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 16:32 IST
२०१४ ते २०२० या काळात जो निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला गेला त्याची किंमत जवळपास ९६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे
गेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा
ठळक मुद्देभारतीय लष्कराकडून खरेदी कऱण्यात येणाऱ्या दारुगोळ्याबाबत धक्कादायक माहिती समोरऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डाकडून खरेदी केलेल्या दारुगोळ्यापैकीत तब्बल ९६० कोटी रुपयांचा दारुगोळा निकृष्ट दर्जाचाया किमतीत लष्कराला तब्बल १०० आर्टिलरी गन खरेदी करता आल्या असत्या