लष्करी इतमामात कर्नल राय यांना अखेरचा निरोप
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
नवी दिल्ली- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बलिदान देणारे कर्नल एम.एन. राय यांच्या पार्थिवावर गुरुवारी संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी येथील छावणीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत देशाच्या या जांबाज वीरास पुष्पांजली वाहिली.
लष्करी इतमामात कर्नल राय यांना अखेरचा निरोप
नवी दिल्ली- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बलिदान देणारे कर्नल एम.एन. राय यांच्या पार्थिवावर गुरुवारी संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी येथील छावणीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत देशाच्या या जांबाज वीरास पुष्पांजली वाहिली. ३९ वर्षीय राय यांना बंदुकांचीही सलामी देण्यात आली. त्यांच्या पार्थिवास त्यांचे ज्येष्ठ बंधू कर्नल डी.एन. राय यांनी मुखाग्नी दिला. तेसुद्धा गोरखा रायफल्समध्ये आहेत. याप्रसंगी सेना मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनी युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू- काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल एम.एन. राय शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)