शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:45 IST

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने या हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर - काश्मीरमधील दहशतवादी कारवायांविरोधात आघाडी उघडणाऱ्या भारतीय लष्कराला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे धक्का बसला होता. मात्र या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने पुलवामा हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्याची आखणी करणाऱ्यासह आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तसेच या वर्षातील पहिल्या 70 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 44 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, या दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची संख्या अधिक आहे. कालापासून पिंगलिश येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्यातील एका मास्टर माइंडचाही समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी लष्कराच्या 15 व्या तुकडीचे जीओसी के.जे.एस ढिल्लन आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. ''गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी 8 दहशतवादी हे पाकिस्तानी होते. तसेच त्यांनी भारतात घुसखोऱी करून दहशतवादी कारयावा करण्याचा कट रचला होता. गेल्या काही दिवसांमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात काही मोठी ऑपरेशन्स तडीस नेली आहेत. तसेच पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहील.'' असे ढिल्लन यांनी सांगितले.

 

दरम्यान, रविवारी पुलवामामधील पिंगलिश येथे झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदच्या मुदस्सिर अहमद याला लष्कराने कंठस्नान घातल्याची माहिती  काश्मीर विभागाचे आयजी स्वयं प्रकाश पाणी यांनी दिली आहे. मुदस्सिर यानेच पुलवामा हल्ल्याचे कारस्थान रचले होते. तसेच तो आणि त्याचे काही सहकारी पुलवामामधील पिंगलिश गावात लपून बसल्याची माहिती लष्करामा मिळाली. त्यानंतर शोधमोहीम राबवून त्यांना कंठस्नान घालण्यात आले. दरम्यान, गावामध्ये लष्काराची शोधमोहीम सुरू आहे. ही मोहीम संपल्यानंतर अन्य माहिती दिली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  

पुलवामा हल्ल्यामध्ये किती स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाग होता, याचा तपास सुरू आहे. रविवारी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत मुदस्सिर याला ठार करण्यात आले आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, घटनास्थळावरून तीन रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी