शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

LOCवर पाक सेनेबरोबर दिसले लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी, भारतात अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 11:59 IST

नवी दिल्ली- बऱ्याचदा पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा फायदा घेत दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात घुसतात. दहशतवाद्यांना भारतात घुसता यावे, ...

नवी दिल्ली- बऱ्याचदा पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा फायदा घेत दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात घुसतात. दहशतवाद्यांना भारतात घुसता यावे, यासाठीच पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याचंही अनेकदा निदर्शनास आलं आहे. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैन्याबरोबर लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी दिसल्यानं एकच खळबळ उडाली असून, भारतात हाय अलर्ट देण्यात आला आहे.इतकंच नव्हे, तर राजोरी आणि पुंच्छ सेक्टरमध्ये स्नायपर्सही सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमधल्या भारताच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट देण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर लष्कर ए तैय्यबाचे दहशतवादी आणि पाकचे स्पेशल कमांडो मिळून राजोरी आणि पुंछमधल्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये हल्ला करण्याचा प्लॅन बनवत आहेत. तत्पूर्वी 30 डिसेंबरला भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला होता.रविवारी (30 डिसेंबर) नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी BAT पथकाचा हल्ला परतवून लावला होता.तसेच या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे  आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता. या घुसखोरांना भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत देण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत न्यावेत, असे आवाहन करण्यात येणार असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले होते.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर