शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

By देवेश फडके | Updated: February 6, 2021 20:11 IST

जम्मू-काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत हिदायतुल्ला मलिक होता, अशी माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देजम्मू आणि अनंतनाग पोलिसांच्या संयुक्त पथकाला मोठे यशलष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटकजम्मू-काश्मीर पोलिसांनी दिला या वृत्ताला दुजोरा

जम्मू : जम्मू आणि अनंतनाग पोलिसांच्या संयुक्त पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला याला आज (शनिवार) जम्मूमध्ये अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत हिदायतुल्ला मलिक होता, अशी माहिती मिळाली आहे. (Lashkar-E-Mustafa Chief Hidayatullah Malik Arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायतुल्ला मलिकच्या जम्मूमधील हालचाली वाढल्या असून, तो दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर जम्मू आणि अनंतनाग पोलिसांच्या एका संयुक्त पथकाने मोहीम हाती घेतली. या मोहिमेला यश मिळाले असून, हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली आहे. हिदायतुल्ला मलिक याला केलेली अटक महत्त्वाची मानली जात आहे. जम्मू येथून अटक केली, तेव्हा हिदायतुल्ला मलिक याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आले.

काश्मीर खोऱ्यात सक्रीय असेलल्या जैश-ए-मोहम्मद या दहशवतावदी संघटनेचा लष्कर-ए-मुस्तफा हा एक भाग आहे. जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील याबाबत माहिती देताना सांगितले की, जम्मू येथे असलेल्या कुंजवानीजवळ दहशवतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता.

गुड न्यूज! तब्बल ५५० दिवसांनी जम्मू काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा; पण...

हिदायतुल्ला मलिक याच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्त्वाची माहिती भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अलीकडेच या दहशतवादी संघटनेला मदत करणाऱ्या काही जणांवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली होती. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी सुरक्षादलांच्या काही ठिकाणांची रेकी करत असल्याची बाब समोर आली होती. ही दहशतवादी संघटना अनंतनाग आणि बिजबिहाडा भागात दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होती, अशी माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीArrestअटकPoliceपोलिस