शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 04:10 IST

संपूर्ण भारतातून चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी, २७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहण ३ तास ५५ मिनिटे होईल. त्यातील खग्रास स्थिती एक तास ४३ मिनिटे दिसेल, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.२७ जुलैच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येईल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर उत्तररात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. उत्तर रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल. २७ जुलै रोजी चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर ४ लक्ष ६ हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. तसेच चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार आहे. त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे ३ तास ५५ मिनिटे एवढा वेळ लागणार आहे. खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे एवढा वेळ दिसेल, असेही सोमण यांनी सांगितले.२७ जुलैचे खग्रास चंद्रग्रहण हे या शतकातील ऐतिहासिक आहे. गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० रोजी झाले होते. त्या वेळी खग्रास स्थिती १ तास ४७ मिनिटे दिसली होती. यापुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे ९ जून २१२३ व १९ जून २१४१ रोजी होणार असून त्या वेळी खग्रास स्थिती १ तास ४६ मिनिटे दिसणार आहे.ग्रहणस्पर्श ते ग्रहणमोक्ष या कालावधीत प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या प्रत्यक्ष मूर्तीवर नानाविध सुक्तासहित जलाभिषेक करण्यात येईल. ग्रहणमोक्षानंतर स्नानविधी झाल्यानंतर पहाटे ४.१५ वाजता पहाटेच्या पूजेला सुरुवात होईल. महापूजेकरिता साधारण दीड तास अपेक्षित आहे. श्रींची पहाटेची मंगलआरती ५.३० ऐवजी ६ वाजता होईल. २७, २८ जुलै रोजी मंदिरातील उर्वरित नित्य कार्यक्रम नेहमीच्या वेळेप्रमाणे होतील.

टॅग्स :Mumbaiमुंबई