शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्रात; राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 08:57 IST

देशातील प्रशिक्षित ड्रोन पायलटची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आहे.

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : देशातील प्रशिक्षित ड्रोन पायलटची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आहे. १ जुलै २०२३ पर्यंत महाराष्ट्रात ७४४ प्रशिक्षित ड्रोन पायलट होते आणि तामिळनाडूमध्ये १०८७ ड्रोन पायलट होते. परंतु, प्रशिक्षण केंद्रांच्या बाबतीत तामिळनाडूमधील चारच्या तुलनेत महाराष्ट्रात ११ केंद्र आहेत. 

देशात ६० प्रमाणित ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहेत. गुजरातेत ६, हरयाणा १०, पंजाब १, नवी दिल्ली १ आणि प. बंगालमध्ये ही संख्या शून्य आहे. प. बंगालमध्ये ११० प्रशिक्षित ड्रोन पायलट आहेत. १३६५  टक्के वेगाने ड्रोन उद्योगाने एका वर्षात वाढ केली आहे. 

२८१  प्रशिक्षित ड्रोन पायलट उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात.५०७२ १ जुलै २०२३ रोजी वैमानिकांची संख्या.

देशात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढला

देशात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. कारण सामान्य तसेच आपत्कालीन सेवांमध्ये अर्थव्यवस्थेच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये या ड्रोनचा वापर होत आहे. ड्रोनच्या क्षेत्रनिहाय वापरामध्ये कृषी, लस वितरण, पाळत ठेवणे, शोध आणि बचाव, वाहतूक, मॅपिंग, संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. 

अतिदुर्गम भाग, वैद्यकीय शस्त्रक्रिया आदींशी जोडण्यात ड्रोन यशस्वी ठरतात. ड्रोनचा वापर तस्कर, दहशतवादी आणि सीमेपलीकडील सैन्याकडून केला जातो, ही वेगळी बाब आहे. ड्रोन ट्रॅकिंग उपकरणेदेखील अंमलबजावणी संस्था वापरत आहेत.