नवी दिल्ली : तीन महिन्यांत व्याजदरात पाऊण टक्के कपात होऊनही त्याचा फारसा लाभ ग्राहकांना मिळाला नसला तरी, आता मात्र लवकरच हा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. यामध्ये बँक प्रमुखांनी दरकपातीचे आश्वासन दिले.काही बँकांनी ताळेबंदाची नाजूक परिस्थिती, बचत खात्यावर द्यावयाचा मोठा व्याजदर यामुळे व्याजदरात कपात करण्यास असमर्थता दर्शविली आहे. तथापि, परिस्थिती आशादायक आहे. यासंदर्भात जेटली म्हणाले, रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेली कपात काही बँकांनी ग्राहकांनाही दिली; परंतु काही बँकांनी ती दिलेली नाही. येत्या काही दिवसांत कपात होऊ शकेल.
मोठ्या व्याजदर कपातीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2015 03:58 IST